Full Width(True/False)

TCL ने भारतात लाँच केल्या ३ शानदार वॉशिंग मशीन, कमी किंमतीत मिळतील जबरदस्त फीचर्स

नवी दिल्ली : लोकप्रिय इलेक्ट्रॉनिक कंपनी ने भारतात तीन स्वस्त लाँच केल्या आहेत. मशीनला फ्रंट लोड आणि टॉप लोड सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आले असून, यात डिजिटल डिस्प्ले सारखे फीचर्स मिळतात. टीसीएलच्या तिन्ही वॉशिंग मशीनची क्षमता ७ किलो, ८ किलो आणि ८.५ किलो आहे. वाचाः टीसीएलच्या या वॉशिंग मशीनला तुम्ही व्हाइट, सिल्वर आणि ग्रे रंगात खरेदी करू शकता. वॉशिंग मशीनची ही नवीन रेंज ऑटो एरर डायग्नोसिस टेक्नोलॉजीसोबत येते. यामुळे आपोआप समस्यांची माहिती मिळते व काय समस्या आहे हे करेक्शन प्रोसेसर डिजिटल डिस्प्लेवर दिसते. जेणेकरून, ही समस्या तुम्हीच सोडवू शकता. TCL च्या नवीन रेंजबद्दल सांगायचे तर याच्या 7KG Front Load Washing Machine ची सुरुवाती किंमत १५,९९० रुपये आहे. तर इतर दोन वॉशिंग मशीनच्या किंमतीचा खुलासा करण्यात आलेला नाही. टीसीएलच्या नवीन फ्रंट लोड आणि टॉप लोड मशीनमध्ये ईआरपी A+++ रेटिंग, हनीकॉम्ब क्रिस्टल ड्रम, ऑटो ड्रम क्लीन टेक्नोलॉजी, डिजिटल डिस्प्ले, ड्यूल डिटर्जेंट केस आणि ऑटो एरर डायग्नोसिस सारखे फीचर्स मिळतात. यामुळे यूजर्सला कपडे धुवताना समस्या जाणवत नाही. वाचाः टीसीएलच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, वॉशिंग मशीनची नवीन रेंज ग्राहकांसाठी संपूर्ण लाँड्री प्रक्रिया सोपी करेल. डिजिटल डिस्प्ले ग्राहकांसाठी वॉश टाइमर समजून घेणे आणि सेट करणे सोपे बनवते. हनीकॉम्ब ड्रम कपडे धुणे आणि ड्रमच्या मध्यभागी पाण्याची एक पातळ परत तयार करतो. यामुळे कपडे सुरक्षित राहतात. ही एनर्जी एफिशिएंट वॉशिंग मशीन असून, वीजेचा कमी वापर होतो. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3BPuITt