Full Width(True/False)

स्किन टेम्परेचर सेन्सरसह TicWatch GTH भारतात लाँच, पाहा किंमत-फीचर्स

नवी दिल्ली. तुम्हाला जर स्मार्टवॉचची विशेष आवड असेल तर तुमच्यासाठी एक पर्याय आता उपलब्ध आहे. नुकतीच बाजरात दाखल झाली असून यात हृदय गती मॉनिटर आणि एसपीओ २ मॉनिटर तसेच त्वचेचे तापमान निरीक्षण देखील आहे. तसेच यात युजर्सना १० दिवसांपर्यंतची बॅटरी लाईफ मिळेल. TicWatch GTH स्मार्टवॉच कंपनीच्या अधिकृत साइटवर ८,५९९ रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आली आहे. त्याचबरोबर स्मार्टवॉच Amazon वर ४,७९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल आहे. हे डिव्हाईस सिंगल ब्लॅक रेवेन कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आले आहे. वाचा: TicWatch GTH चे वैशिष्ट्य हे बजेट स्मार्टवॉच आरटीओएस सॉफ्टवेअरवर चालते. यात १.५५ इंचाचा टचस्क्रीन टीएफटी (३६०x३२० पिक्सेल) डिस्प्ले आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, या घड्याळात ब्लूटूथ व्ही ५.१ चे समर्थन आहे. याची बॅटरी २६० mAh आहे आणि त्यामध्ये युजर्सना दहा दिवसांचे बॅटरी बॅकअप मिळेल. या घड्याळात ५० मीटरपर्यंत पाण्याचे प्रतिकारही देण्यात आले आहे. TicWatch GTH मध्ये १४ स्पोर्ट्स मोड्स आहेत. या मोडमध्ये इनडोअर रन, मैदानी धाव, मैदानी सायकलिंग, पोहणे आणि चालणे समाविष्ट आहे. या घड्याळात युजर्सना २४ तास हृदय गती, रक्त ऑक्सिजन आणि त्वचेचे तापमान देखरेखीचे वैशिष्ट्य देण्यात आले आहे. तसेच, या घड्याळामध्ये ताणतणावासाठी देखील फीचर देण्यात आले आहे. या व्यतिरिक्त, वॉच श्वसन दर सेन्सरद्वारे युजर्सच्या श्वासोच्छवासाचे परीक्षण देखील करू शकते. त्यामध्ये उपस्थित असलेल्या एसपीओ २ सेन्सर पीपीजी तंत्रज्ञानाचा वापर याकरिता केला जातो. स्मार्टवॉच फोन मेसेजेस, अलार्म आणि सोशल अपडेट्स यासारख्या सूचनाही दर्शविते . यासह, यातून संगीत नियंत्रित करण्यास देखील युजर्सना एनेबल असतील. या व्यतिरिक्त, युजर्सना वर्क आऊट रिमाइंडर्स देखील मिळतील. Find My Phone पर्याय देखील येथे उपलब्ध असेल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3wSAZdE