Full Width(True/False)

Video- लाईव्ह सेशनवेळी राहुल वैद्य- दिशा परमारचं भांडण

मुंबई : ‘बिग बॉस’ कार्यक्रमामुळे घराघरात लोकप्रिय झालेला गायक आणि छोट्या पडद्यावरील अभिनेत्री यांनी १६ जुलै रोजी लग्न केले. महाराष्ट्रीयन आणि पंजाबी अशा दोन्ही पद्धतींनी त्यांनी लग्न केले. त्यांच्या लग्नातील, त्याआधी हळद, संगीत कार्यक्रमाचे फोटो- व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले होते. लग्नानंतर राहुलच्या घरी दिशाचे जोरदार स्वागत झाले. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला होता. लग्नानंतरही दोघे सोशल मीडियावर खूपच सक्रीय आहेत. लग्नानंतर पहिल्यांदाच त्यांनी इन्स्टाग्रामवरून लाईव्ह केले आणि आपल्या चाहत्यांशी त्यांनी संवाद साधला. परंतु या लाईव्ह सेशनच्यावेळी असे काही घडले की त्याची कुणीच कल्पनाही केली नव्हती. या लाईव्हच्या वेळी त्यांच्या एका चाहत्याने दिशाला विचारले की, तिने सिंदूर का नाही लावला. बस या गोष्टीवरून दिशा आणि राहुलमध्ये लुटुपुटूचे भांडणच झाले... या गोष्टीचे खापर दिशाने राहुलच्या डोक्यावर फोडले. राहुलचे इन्स्टाग्रामवर २० लाख फॉलोअर्स पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्याने हे लाईव्ह केले होते. दिशा आणि राहुल हे दोघेही एकत्र लाईव्ह आले होते. त्यावेळी चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. याचवेळी एका चाहत्याने दिशाला सिंदूर का लावले नाही असा प्रश्न विचारला. मग राहुलनेदेखील दिशाला हाच प्रश्न विचारला. त्यावर दिशाने तिच्या मजेशीर अंदाजामध्ये उत्तर दिलं. 'आता तुम्ही आमच्यात त्यावरून भांडण लावणार आहात का? पण खरे सांगायचे तर राहुलमुळेच मी सिंदूर लावू शकले नाही. कारण त्याने मला तेवढा वेळच दिला नाही.' ती पुढे असे म्हणाली, 'बिग बॉस च्या घरात असताना राहुलने मला वचन दिले होते की, तो मला रोज सिंदूर लावणार परंतु आता मात्र तो हे विसरून गेला.' त्यावर राहुने हजरजबाबीपणे उत्तर दिले की, 'आपण दोघेही वेगवेगळ्या वेळी तयार होतो. परंतु तू जेव्हा आधी तयार होतेस तेव्हा तुझं तू सिंदूर लावत जा. सिंदूर नवऱ्याच्या प्रेमाचे प्रतीक असते. त्यामुळे दिशा तू उद्यापासून सिंदूर लावत जा.' त्यानंतर दिशाने अंगठी न घातल्याबद्दल सांगितले की, 'काम करताना मी अंगठी काढून ठेवली होती आणि त्यानंतर घालायची विसरून गेले.' या लाइव्ह सेशनवेळी अनेक चाहत्यांनी राहुलला सिंदूर लावण्याची विनंती केली. त्यावर दिशाने आपल्या हातातील चुडा दाखवला. दरम्यान, राहुल त्याच्या व्यक्तिगत आयुष्याबरोबरच प्रोफेशनल आयुष्यातही बराच चर्चेत आहे. राहुलने बिग बॉस १४ नंतर खतरों के खिलाडी कार्यक्रमात सहभागी झाला होता. असं म्हटलं जातं की, राहुल वैद्यने एका एपिसोडसाठी ५ लाख रुपये मानधन घेतले होते. या स्पर्धेतील तो सर्वात महागडा स्पर्धक होता.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2WACTDg