नवी दिल्ली. गेल्या काही काळात अनेक भारतीय ब्रॅंड्सने विविध इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेस लाँच केले. यात टीव्हीचा देखील समावेश होता. नुकताच, Daiwa ने भारतातल्या ग्राहकांसाठी असा पहिला स्मार्ट टीव्ही बाजारात लाँच केला आहे जो वेबओएस वर काम करतो. हा ५० इंच ४ के यूएचडी स्मार्ट टीव्ही ThinQ एआय व्हॉईस सहाय्य आणि मॅजिक रिमोटसह लाँच करण्यात आला आहे. या टीव्हीचा मॉडेल नंबर D50U1WOS आहे. तुम्हाला देखील मेड इन इंडिया टीव्ही खरेदी करायचा असेल तर या टीव्हीचा नक्की विचार करा. वाचा: हा टीव्ही ग्राहाकांना घरी थिएटरसारखा अनुभव देतो. शिवाय, १.०७ अब्ज रंग आणि ४ के व्हिज्युअल आणि अल्ट्रा-हाय डेफिनिशन पिक्चर रेशिओला सपोर्ट करतो. या डायवा वेबओएस टीव्हीवर पातळ, आकर्षक फ्रेमसह बेझल-कमी प्रदर्शन आणि ९६ टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशो आहे. डायवा यूएचडी स्मार्ट टीव्हीमध्ये डॉल्बी ऑडिओ साऊंड टेक्नॉलॉजीसह २० डब्ल्यू सभोवताल साउंड बॉक्स स्पीकर्स आहेत जे ग्राहकांना एक चांगला ऑडिओ अनुभव देतात. युजर्सचा सिनेमा पाहण्याचा अनुभव अधिक चांगला व्हावा याकरिता यात नवीन सिनेमा मोडमध्ये डी ६५०० कलर तापमानासह कॅलिब्रेट करण्यात आले आहे. टीव्ही ALLM (ऑटो लो लेटन्सी मोड) चे समर्थन करते जे एक सहज गेमिंग अनुभवासाठी इनपुट अंतर कमी करण्यासाठी काम करते. तसेच, एचडीआर १० आणि एचएलजी (हायब्रिड लॉग गामा) सारख्या मल्टी-एचडीआर फॉरमॅटला देखील समर्थन देते. Amazon प्राइम व्हिडिओ, नेटफ्लिक्स, डिस्ने + हॉटस्टार व्यतिरिक्त टीव्ही सोनीलिव्ह, यूट्यूब आणि झी ५ सारख्या अॅप्सना सपोर्ट करतो. या व्यतिरिक्त, कंटेंट स्टोअरमधील युझर्ससाठी बरेच गेम देखील उपलब्ध आहेत. ड्युअल-बँड वाय-फाय, एमईएमसी, एएलएलएम यासह ५० इंचाच्या डाईवा स्मार्ट टीव्हीमध्ये अनेक प्रगत वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. टीव्ही वेगवान वेब-ब्राउझिंग, स्मूथ मल्टी-टास्किंग आणि उत्कृष्ट कामगिरीची खात्री देतो . या टीव्हीला एआरएम सीए ५५ १.१ जीएचझेड क्वाड-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो पारंपारिक टीव्हीपेक्षा चारपट वेगवान आहे. या टीव्हीमध्ये ग्राहकांना १.५ जीबी रॅम आणि ८ जीबी स्टोरेज मिळेल. : किंमतभारतात Daiwa 50 inch 4K UHD Smart TV किंमत, ४३, ९९० रुपये आहे आणि सर्व प्रमुख रिटेल स्टोअर व कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर हा टीव्ही खरेदीसाठी उपलब्ध आहे वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3yDQvvf