नवी दिल्ली : सरकारी टेलिकॉम कंपनी () ने आपल्या ग्राहकांसाठी खास प्लानची घोषणा केली आहे. कंपनीने आपला लोकप्रिय ३९८ रुपयांच्या स्पेशल टॅरिफ वाउचर प्लानला (STV) रिवाइज्ड केले आहे. यामध्ये आता यूजर्सला अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंगसह अनेक लाभ मिळत आहेत. वाचा: तुम्ही जर करत असाल अथवा मुलं ऑनलाइन क्लास करत असतील तर हा प्लान सर्वोत्तम आहे. ३९८ रुपयांच्या या प्लानची वैधता ३० दिवस असून, यात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस मिळतात. याशिवाय अनलिमिटेड डेटाची सुविधा देखील कंपनी देत आहे. जानेवारी महिन्यात प्लान लाँच झाल्यानंतर ग्राहकांकडून मोठी पसंती मिळाली होती. त्यानंतर आता कंपनीने प्लानला रिवाइज्ड केले आहे. वाचा: जर तुम्हाला बीएसएनएलचे ३९८ रुपयांचे रिचार्ज करायचे असेल तर कंपनीचे ऑनलाइन पोर्टल, रिटेलर शॉप आणि सीएससीवर जावे लागेत. कंपनीने २४७ रुपयांचा एसटीव्ही प्लान देखील रिवाइज्ड केला असून, यात ग्राहकांना ३० दिवसांसाठी ५० जीबी डेटा देत आहे. कंपनीने १,९९९ रुपयांचा प्लान देखील रिवाइज्ड केला असून, यामध्ये ग्राहकांना ५०० जीबी डेटासह चे सबस्क्रिप्शन आणि बीएसएनएल ट्यून्सची सुविधा मिळते. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3AGzzWP