Full Width(True/False)

Whatsapp वर मेसेज पाठवून डिलीट केलाय?, वाचण्यासाठी या ट्रिक्स वापरा

नवी दिल्लीः How To See Deleted Whatsapp Message: व्हॉट्सअॅपचा वापर भारतात कोट्यवधी लोक करीत आहेत. या अॅपद्वारे लोक चॅटिंग सोबत ऑडियो आणि व्हिडिओ कॉलिंग सुद्धा करतात. व्हॉट्सअॅपचा वापर करणारे अनेक जण या अॅप संबंधित टिप्स आणि ट्रिक्सच्या शोधात असतात. या अॅप मध्ये अशा अनेक गोष्टी आहेत. ज्या अनेकांना माहिती नाहीत. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी एक छोटीसी ट्रिक म्हणजे डिलीट झालेले मेसेज, ऑडियो आणि व्हिडिओ पाहू शकतात. वाचाः खूप सोपी आहे व्हॉट्सअॅप ट्रिक कोणी जर तुम्हाला मेसेज केला आणि काही सेकंदानंतर तो डिलीट केला तर तुमच्या डोक्यात चक्र सुरू होते की, अखेर त्याने काय पाठवले असेल. परंतु, तुम्हाला चिंता करण्याची आजिबात गरज नाही. आता काही स्टेप्स फॉलो करून तुम्ही याची माहिती करून घेऊ शकता. डाउनलोड करा व्हॉट्सअॅप डिलीट अॅप या ट्रिकला यूज करण्यासाठी तुम्हाला थर्ड पार्टी अॅपचा वापर करावा लागेल. सर्वात आधी व्हॉट्सअॅप डिलीट अॅपला इन्स्टॉल करा. डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला येस वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर परमिशनला अलाउ करावे लागेल. त्यानंतर हे अॅप व्यवस्थित काम करेल. या पद्धतीने दिसेल डिलीट झालेला मेसेज, ऑडियो किंवा व्हिडिओ त्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअॅप वर काही सेटिंग्स करावी लागेल. व्हॉट्सअॅप ओपन करून तीन डॉट्स वर क्लिक करा. सेटिंग्स मध्ये जाऊन डेटा अँड स्टोरेज युजेस वर जा. मीडिया ऑटो डाउनलोड वर जाऊन तुम्हाला सर्व फाइल ऑटोमॅटिक डाउनलोड होईल. त्यानंतर तुम्हाला मेसेज, ऑडियो किंवा व्हिडिओला रिकव्हर करावे लागेल. यानंतर कोणताही मेसेज, ऑडियो, किंवा व्हिडिओ क्लिप पाठवून डिलीट केल्यास तुम्हाला त्यानंतर या अॅपला ओपन करून ज्याला डाउनलोड केले होते. व्हॉट्सअॅप डिलीट ओपन करून तुम्हाला डिलीट झालेला मेसेज, ऑडियो किंवा व्हिडिओ पाहता येईल. याला रिकव्हर करता येईल. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3yQU5Ci