Full Width(True/False)

राज कुंद्राची एकूण संपत्ती किती? अटकेनंतर Video Viral

मुंबई- लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा याला काल रात्री मुंबई पोलिसांनी अटक केली. राज एक व्यावसायिक असून पोलिसांनी त्याला अश्लील व्हिडिओ बनवून वेबसाइटवर प्रदर्शित करण्याच्या गुन्ह्याअंतर्गत अटक केली आहे. राजच्या अजून एका साथीदारालाही अटक करण्यात आली आहे. राजच्या अटकेने सगळेच आश्चर्य व्यक्त करत आहेत. यातच राज आणि यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यात कपिल शर्मा त्याच्या कार्यक्रमात राजला त्याच्या कमाईबद्दल आणि राजेशाही रहाणीमानाबद्दल प्रश्न विचारताना दिसतो. काही वर्षांपूर्वी राज आणि शिल्पा यांनी कपिल याच्या '' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. तेव्हा कपिलने राजला मस्करीमध्ये विचारले की त्याच्याकडे एवढा पैसा येतो कुठून? कपिल म्हणतो, 'राज तू तर खूप व्यग्र असतो. कधी फुटबॉल खेळताना दिसतोस, कधी विमान प्रवास करताना दिसतो, कधी बातम्यांमध्ये दिसतो, कधी कुठे फिरायला गेलेले असतोस, नाहीतर शिल्पासोबत शॉपिंग करताना दिसतो. माझा एका प्रश्नाचं उत्तर दे की, काहीच न करता तुम्ही पैसे कसे कमावता?' कपिलने व्हिडिओत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देत नेटकऱ्यांनी लिहिलं, 'आता कपिलला त्याच्या प्रश्नाचं योग्य उत्तर नक्की मिळालं असेल.' हा व्हिडीओ ट्विटरवर प्रचंड व्हायरल होत आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये अश्लील सिनेमे बनवणे आणि त्या प्रदर्शित करणे याबद्दल मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. राजच्या विरोधात पुरावे असल्याने मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली आहे. राजच्या संपत्तीबद्दल बोलायचं तर त्याच्याकडे २ हजार ८०० कोटींची संपत्ती आहे. त्याची महिन्याची कमाई ५० कोटींच्या आसपास आहे. याशिवाय जुहू परिसरात त्याचा आलिशान बंगला आहे. दुबईतील बूर्ज खलिफा येथेही त्याचा फ्लॅट आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ipOWdP