नवी दिल्लीः इंस्टेंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप (WhatsApp) वर एक नवीन फीचर आले आहे. या फीचर द्वारे व्हॉट्सअॅप युजर कोणत्याही ग्रुप व्हिडिओ किंवा व्हाइस कॉलला सूटल्यानंतर जॉइन करू शकतील. या अपडेट द्वारे युजर्स ग्रुप कॉलला मध्येच सोडू शकता किंवा पुन्हा जोडू शकते. यासाठी कॉल सुरू असणे आवश्यक आहे. व्हॉट्सअॅपने नवीन ग्रुप कॉल फीचर सोमवारी रोल आउट करणे सुरू केले आहे. लकवरच हे तुमच्या डिव्हाइसवर येईल. वाचाः जर तुम्ही कोणता व्हॉट्सअॅपचा ग्रुप व्हिडिओ किंवा व्हाइस कॉल मिस करत असाल तर स्वतः याला जॉइन करू शकता. कॉलला जोडलेल्या मेंबर्सला नवीन मेंबर जोडण्याची सुविधा जरूर मिळते. व्हॉट्सअॅपने आपल्या ब्लॉग पोस्ट मध्ये म्हटले की, नवीन फीचर आल्यानंतर युजर्सवर याचा दबाव राहणार नाही की, ग्रुप कॉल येताच तुम्हाला याच्याशी जोडणे आवश्यक आहे. वाचाः व्हॉट्सअॅप वर मिस झालेला ग्रुप कॉल असा जॉइन करा व्हॉट्सअॅपवर ग्रुप कॉल मिस झाल्यानंतर आता एक तुम्हाला नवीन ऑप्शन मिळेल. जर तो ग्रुप कॉल अजूनही चालू असेल तर व्हॉट्सअॅपच्या कॉल लॉग मध्ये तुम्हाला टॅप टू जॉइन ऑप्शन मिळेल. या ऑप्शनवरप क्लिक करताच तुम्ही ग्रुप कॉलशी जोडले जाल. व्हॉट्सअॅपने एक नवीन कॉल इन्फो स्क्रीन सुद्धा तयार केली आहे. जी युजर्संना सांगेल की, कोणत्या युजरने इनव्हाइट केल्यानंतर कॉल ज्वॉइन केला नाही. ग्रुप कॉल आल्यानंतर तुम्हाला ignore आणि Join असे दोन ऑप्शन दिसतील. वाचाः फोन बंद असूनही करता येणार चॅटिंग व्हॉट्सअॅपवर आणखी एक नवीन फीचर येत आहे. या अंतर्गत फोन बंद असून चॅटिंग करता येईल. ही सुविधा मल्टी डिव्हाइस सपोर्ट फीचर अंतर्गत मिळेल. आता तुम्हाला वेब किंवा डेस्कटॉप व्हर्जन मध्ये व्हॉट्सअॅप चालवण्यासाठी इंटरनेट अॅक्टिव ठेवावे लागते. नवीन फीचर आल्यानंतर फोनला अॅक्टिव न ठेवता किंवा इंटरनेटशी कनेक्ट न ठेवता युजर लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅप चॅटिंगची मजा घेवू शकतील. कंपनीच्या या फीचरला आता बीटा व्हर्जन मध्ये रोलआउट करीत आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3zEYZmh