Full Width(True/False)

भारतीय बाजारात धुमाकूळ घालणार Xiaomi, लाँच करणार शानदार लॅपटॉप

नवी दिल्ली : स्मार्टफोन मार्केटमध्ये दबदबा निर्माण केल्यानंतर आता Xiaomi सेगमेंटमध्ये देखील उतरणार आहे. भारतीय बाजारात आपल्या प्रोडक्ट पोर्टफोलियोमध्ये विस्तार करत आहे. याआधी कंपनीने देशात लॅपटॉपचे काही मॉडेल लाँच केले आहेत. आता भारतात नवीन मॉडेल्स लाँच करण्याच्या तयारीत आहे. वाचाः लीक रिपोर्टनुसार, शाओमी या महिन्याच्या अखेरीस भारतीय बाजारात एमआयचे ब्रँडेड लॅपटॉप रेंजमधील काही लॅपटॉप्स सादर करण्याच्या तयारीत आहे. शाओमीचा सब-ब्रँड रेडमी देखील पुढील काही आठवड्यात भारतात एक नवीन लॅपटॉप लाँच करण्यावर काम करत आहे. कंपनी Mi Laptop Pro ला भारतात सादर करण्याची शक्यता आहे. कंपनीने या लॅपटॉपला वर्षाच्या सुरुवातीला चीनमध्ये लाँच केले होते. मात्र, अद्याप कंपनीने अधिकृत माहिती दिलेली नाही. वाचाः फ दरम्यान, शाओमीने गेल्या महिन्यात लॅपटॉपला चीनमध्ये लाँच केले होते. कंपनीने या लॅपटॉपमध्ये ओलेड डिस्प्ले, यूनिबॉडी अॅल्यूमिनियम डिझाइन आणि ११ th जनरेशन इंटेल कोर प्रोसेसर दिले आहे. हा नवीन लॅपटॉप Nvidia GeForce RTX 3050 Ti ग्राफिक्ससोबत येतो. यामध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील मिळेल. कंपनीचे म्हणणे आहे की यातील बिल्ट-इन बॅटरी २५ मिनिटात शून्य ते ५० टक्के चार्ज होते. Mi Notebook Pro X १५ ची सुरुवाती किंमत ७,९९९ CNY (जवळपास ९२,१०० रुपये) आहे. यात ११th generation Intel Core i५-११३००H प्रोसेसर व्हेरिएंट देखील आहे. यामध्ये १६ जीबी रॅम आणि ५१२ जीबी SSD स्टोरेज मिळते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3yqjDWz