Full Width(True/False)

मोबाईल क्रमांकाशिवाय 'असे' मिळवा Aadhaar Card, पाहा ही सोप्पी ट्रिक

नवी दिल्ली. भारतीयांना आधार कार्ड आवश्यक आहे. तुम्ही भारतीय नागरिक असाल तर भारत सरकारने दिलेल्या फायद्यासाठी आणि इतर महत्त्वपूर्ण कामांसाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. आधार कार्ड अ‍ॅड्रेस प्रूफ आणि ओळखपत्र या दोन्हीसाठी अतिशय महत्वाचे आहे. भारतीय अद्वितीय ओळख प्राधिकरण (यूआयडीएआय) १२ अंकी अद्वितीय ओळख क्रमांक जारी करतो. वाचा: आधार केंद्र किंवा बँक / पोस्ट ऑफिसला भेट देऊन कोणतीही व्यक्ती आधार कार्डसाठी नाव नोंदणी करू शकते. यानंतर, युआयडीएआय द्वारा जारी केलेल्या एनरोलमेंट आयडी, व्हर्च्युअल आयडीद्वारे त्याचे आधार कार्ड देखील मुद्रित करू शकेल. आज आम्ही सांगत आहो की, एकदा आधार क्रमांक जारी झाल्यानंतर, कुणालाही आपले आधार वेग-वेगळ्या मार्गांनी डाउनलोड किंवा रिप्रिंट कसे करता येईल. या टिप्सच्या मदतीने तुम्ही आधारवर नोंदणीकृत मोबाईल नंबर नसेल तरी देखील सहज आधार कार्ड कसे रिप्रिंट करू शकता. नोंदणीकृत मोबाइल नंबर शिवाय आधार कार्ड कसे मिळवायचे? नोंदणीकृत मोबाईल नंबरशिवाय तुम्हाला आधार ऑनलाइन मिळू शकत नाही. पण, खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही मोबाईल नंबरशिवाय आधार मिळवू शकता. १. जवळील आधार केंद्राला आपल्या आधार क्रमांकासह भेट द्या. २. आता आवश्यक बायोमेट्रिक तपशील सत्यापन करा. जसे अंगठा पडताळणी आणि रेटिना स्कॅन इ. ३. आपल्याबरोबर पॅन आणि ओळखपत्र यासारख्या इतर ओळख पुरावा घेऊन जा. ४. प्रक्रिया झाल्यानंतर, आपल्याला केंद्रातील संबंधित व्यक्तीद्वारे आपल्या आधारचे प्रिंट आउट दिले जाईल. सामान्य कागदाच्या स्वरूपात तयार केलेल्या आधारसाठी ५० आणि पीव्हीसी आवृत्तीसाठी १०० रुपय द्यावे लागतील. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hIgECl