Full Width(True/False)

Bigg Boss OTT : इथे पाहा स्पर्धकांची संपूर्ण यादी

मुंबई: टीव्हीवरील सर्वात मोठा रिअलिटी शो बिग बॉसचा नवा सीझन ८ ऑगस्टला सुरू होत आहे. पण यावेळी हा शो टीव्हीच्या ६ आठवडे आधी वूट अॅपवर ची सुरुवात होत आहे. मात्र नेहमीप्रमाणे सलमान खान नाही तर या ओटीटी शोचं होस्टिंग करणार आहे. तसेच बिग बॉस १५ ओटीटीच्या ६ आठवड्यांनंतर सुरू होणार असून याचं होस्टिंग सलमान खान करणार आहे. पण त्याआधी ओटीटी शोसाठीच्या स्पर्धकांची यादी समोर आली आहे. बॉलिवूड गायिका नेहा भसीनचं नाव '' सुरुवातील कम्फर्म करण्यात आलं आहे. पण तिच्या व्यतिरिक्त इतर स्पर्धकांची नावंही चर्चेत होती. ज्यात मॉडेल आणि अभिनेत्री दिव्या अग्रवालपासून ते करण नाथपर्यंत वेगवेगळ्या कलाकारांच्या नावाचा समावेश होता. अशात आता स्पर्धकांच्या नावांची अंतिम यादी समोर आली आहे. ज्यात 'इंडियन मैचमेकिंग' फेम सीमा तपारिया यांच्याही नावाचा समावेश आहे. बिग बॉस ओटीटीच्या स्पर्धकांच्या अंतिम यादीत, सिंगर , राकेश बापट, , रिद्ध‍िमा पंडित, करण नाथ, , दिव्‍या अग्रवाल, प्रतीक सेहजपाल, उर्फी जावेद, अक्षरा सिंह, जीशान खान, नेहा मलिक, पवित्रा लक्ष्‍मी, सीमा तपारिया या स्पर्धकांच्या नावांचा समावेश आहे. या स्पर्धकांपैकीच काही स्पर्धक पुढे बिग बॉस १५ मध्ये सहभागी होणार आहे. 'बिग बॉस ओटीटी'चा प्रीमियर वूट सिलेक्टवर ८ ऑगस्टला म्हणजेच आज रात्री ८ वाजता होणार आहे. त्यानंतर रोज ७ वाजता हा शो वूट अॅपवर दाखवला जाणार आहे. मात्र प्रत्येक रविवारी हा शो रात्री ८ वाजता वूट अॅपवर प्रसारित होणार आहे. पण हा शो पाहण्यासाठी प्रेक्षकांना वूटचं सब्सक्रिप्शन घ्यावं लागणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3jzobUX