Full Width(True/False)

बहीणच रक्षक!मराठी सिनेसृष्टीतील 'या' अभिनेत्री आहेत सख्ख्या बहिणी

मुंबई टाइम्स टीम एकमेकींची साथ महत्त्वाचीगेली ३६ वर्षं आम्ही चौघी बहिणी रक्षाबंधनाच्या दिवशी एकमेकींना राखी बांधतो. प्रत्येक संकटात आणि दुःखात एकमेकींना साथ देतो. लहानपणापासूनच आम्हाला स्वतंत्रपणे वाढवलं गेलं आहे. मुली असूनही बंधनं नव्हती. रक्षण करायला भाऊ नसला तरी आम्ही बहिणीच एकमेकींचं संरक्षण करतो. - वंदना गुप्ते, अभिनेत्री घट्ट नातं आमचं नातं लहानपणापासूनच घट्ट आहे. त्याच्यासाठी कोणत्याही धाग्याची गरज नाही. कोणताही निर्णय घेताना आम्ही एकमेकींच्या सोबत असतो. पल्लवी मनोरंजनसृष्टीत माझ्या आणि बाबांच्या सांगण्यावरून आली. तिने पहिली मालिका माझ्यासोबतच केलेली. ती नेहमी माझ्यासोबत असते. मी मोठी असले तरीही माझ्या चुका सुधारण्याचा प्रयत्न ती करते. पुढच्या सगळ्या जन्मात मला हीच बहीण हवी. - पुर्णिमा तळवळकर, अभिनेत्री ताईसोबतचं नातं खासआमची राखीपौर्णिमा एकत्र असते. मला इतर अनेक भावंडं असल्यानं आम्ही सगळे एकत्र येऊन खूप धमाल करतो. पण मृण्मयी ताईसोबतचं रक्षाबंधन खास असतं. दरवर्षी मी ताईला राखी बांधते. ताई नेहमी माझ्यासोबत असते. आमची मजा, एकत्रं गाणी गाणं हे सगळंच खूप कमाल आहे. तिच्यासारखी गोड बहीण माझ्याकडे आहे, याचा मला आनंद आहे. - गौतमी देशपांडे, अभिनेत्री प्रत्येक रक्षाबंधन एकत्रप्रत्येक रक्षाबंधनाला आम्ही एकमेकींना राखी बांधतो. एकतर दरवर्षी भावांकडे जायला वेळ मिळतोच असं नाही. गेल्या काही वर्षांत आमच्या एक लक्षात आलंय की, आम्ही दोघी प्रत्येक सणाला एकत्र असतो. त्यामुळे गेली पाच-सहा वर्षं आम्ही एकमेकींना राखी बांधून राखीपौर्णिमा साजरी करतोय. आमचं नातं छान आहे. खुशबू माझी खूप काळजी घेते आणि ती खूप गोड आहे. - तितीक्षा तावडे, अभिनेत्री सर्वार्थाने रक्षण करतोमी व चैताली एकमेकींना राखी बांधतो. प्रत्येकाला भाऊ असेलच असं नाही. बहीणही रक्षण करू शकते. त्यामुळे गेली अनेक वर्षं आम्ही राखीपौर्णिमा एकत्र साजरी करतोय. आम्ही सर्वार्थानं एकमेकींचं संरक्षण करतो. आमच्याकडे बघून अनेक चाहत्यांनीसुद्धा हे असं करायला सुरूवात केली आहे. त्यामुळे खूप छान वाटतं. - भार्गवी चिरमुले, अभिनेत्री ताईच मला भावासारखी!आम्हा दोघींसाठी रक्षाबंधन खास आहे. कारण आम्हाला सख्खा भाऊ नसल्यानं लहानपणापासूनच मृणाल ताईच माझ्यासाठी माझा दादा आहे. ताईने माझी खूप काळजी घेतलीय. चिडवणाऱ्या मुलांपासून वाचवणं, शाळेत सोडायला येणं, माझं शिक्षण या सगळ्यात तिने मला मार्गदर्शन केलंय. भाऊ किंवा बहीण असा भेद मी कधीच केला नाही. ती नेहमी माझी रक्षक होती आणि आहे. ताईने कधीच भावाची उणीव भासू दिली नाही. - समिधा गुरू, अभिनेत्री संकलन- संपदा जोशी


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3k9aHzo