Full Width(True/False)

देशाचे खरे निर्माते मुघल होते, कबीर खानच्या वक्तव्यामुळे नवा वाद

मुंबई : सिनेमांमध्ये मुघल सम्राटांना अयोग्य रित्या दाखवले जात असल्याबद्दल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. इतकेच नाही तर मुघल हेच खरे 'राष्ट्रनिर्माता आहेत,' असे वक्तव्यही त्यांनी केले होते. 'बजरंगी भाईजान', 'काबुल एक्सप्रेस' आणि ' एक था टायगर' या सिनेमांचे दिग्दर्शन केलेल्या यांनी अशी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केले जात आहे. सोशल मीडियावर कबीर खान यांच्यावर युझर्स कडाडून टीका करत असून कॉमेन्टच्या माध्यमातून आपला राग व्यक्त करत आहेत. काही युझर्सच्या मते मंदिर उद्धवस्त करणे अथवा विद्यापीठे जाळणे हे जर राष्ट्र निर्माण करणे असेल तर खरोखरच मुघल 'राष्ट्र निर्माते' आहेत. ट्विटरवर अनेक युझर्सनी कबीर खान यांच्याविरोधात ट्विट करत त्यांचा निषेध केला आहे. कबीर खानच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर नवा वाद निर्माण झाला आहे. मुघलांच्या वक्तव्यावरून नेटक-यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 'कबीर खान आता तालिबान्यांचं कौतुक करणारा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीस आणेल', अशी टीका एकाने केली. तर काहींनी त्यावर मीम्ससुद्धा पोस्ट केले आहेत. कबीर खान काय म्हणाला एक ऑनलाईन पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये कबीर खानने म्हटले की, ' बहुतांश सिनेमांमध्ये मुघलांना 'खुनी' दाखवण्यात येऊन त्यांना बदनाम करण्यात आले आहे. ही गोष्ट संतापजनक आहे. एखाद्या दिग्दर्शकाने त्या गोष्टींवर संशोधन केले असेल, अभ्यास केला असेल आणि त्याला त्याचा वेगळा मुद्दा अधोरेखित करायचा असेल तर मी समजू शकतो. अर्थात, लोकांचे वेगवेगळे दृष्टीकोन असू शकतात. परंतु जर तुम्हाला खरोखरच मुघलांना नकारात्मक भूमिकेत दाखवायचे असेल तर आधी त्यावर संशोधन करा आणि ते खलनायक का होते हे आम्हाला नीट समजावून सांगा," असे तो म्हणाला. मुघल हे खरे राष्ट्रनिर्माते मुघलांच्या चित्रणाविषयी कबीर खान पुढे म्हणाला, "जर योग्य संशोधन केले आणि ऐतिहासिक पुराव्यांचा आधार घेतला तर मुघलांना खलनायक का व्हावे लागेल हे समजणे फार कठीण आहे. माझ्या मते ते खरे राष्ट्रनिर्माते होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3BcfdUG