तुम्ही जर तुमच्या जुन्या स्मार्टफोनला कंटाळला असाल व नवीन फोन खरेदी करण्याचा विचार असेल तर चांगली संधी आहे. तुम्ही जुन्या फोनला एक्सचेंज करून अपग्रेड करू शकता. शाओमीने आपल्या अधिकृत वेबसाइटवर ग्राहकांसाठी एक्सचेंज डेज सेल सुरू केला आहे. २ ऑगस्टपासून हा सेल सुरू झाला असून, ४ ऑगस्टपर्यंत या सेलचा फायदा ग्राहकांना घेता येईल. सेलमध्ये जुना फोन एक्सचेंज करून तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करू शकता. नवीन फोन खरेदी करताना जवळपास १५ हजार रुपयांपर्यंत बचत होईल. सेलमध्ये तुम्हाला Mi 10i, Redmi Note 10 Pro, Redmi Note 10 Pro Max, Mi 11X Pro 5G आणि Mi 11X 5G सारख्या स्मार्टफोन्सवर एक्सचेंज ऑफर मिळत आहे. या स्मार्टफोन्सवर Xiaomi Exchange Days सेलमध्ये मिळणाऱ्या ऑफर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Mi 10i
Mi 10i या स्मार्टफोनवर १३ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळत आहे. याशिवाय एसबीआय क्रेडिट कार्डचा वापर केल्यास फोनवर १,५०० रुपये इंस्टंट डिस्काउंट दिले जात आहे. या फोनचे वैशिष्ट्यं सांगायचे तर यामध्ये स्नॅपड्रॅगन ७५०जी प्रोसेसर, १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, १२० हर्ट्जचा डिस्प्ले, ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४८२० एमएएचची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. फोनच्या ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी व्हेरिएंटची किंमत २०,९९९ रुपये, ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत २१,९९९ रुपये, ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २३,९९९ रुपये आहे.
Redmi Note 10 Pro
रेडमीच्या या फोनवर १०,७५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळते. या फोनमध्ये ६४ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, स्नॅपड्रॅगन ७३२जी प्रोसेसर, १२० हर्ट्ज डिस्प्ले, ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५०२० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. Redmi Note 10 Pro च्या ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी व्हेरिएंटची किंमत १५,९९९ रुपये, ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत १७,९९९ रुपये, ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १८,९९९ रुपये आहे.
Redmi Note 10 Pro Max
या मॉडेलवर ११ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. मात्र, ही ऑफर फोनच्या केवळ ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी व्हेरिएंटची आहे. फोनचे वैशिष्ट्यं सांगायचे तर यात १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, १२० हर्ट्ज डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन ७३२जी प्रोसेसर आणि ५०२० एमएएच बॅटरीसह ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. Redmi Note 10 Pro Max स्मार्टफोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत १९,९९९ रुपये आहे.
Mi 11X Pro 5G
एमआयच्या या मॉडेलवर १५ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळत आहे. याशिवाय एसबीआय क्रेडिट कार्डवर ३ हजार रुपये इंस्टंट डिस्काउंट दिले जात आहे. फोनमध्ये १२० हर्ट्ज एमोलेड डिस्प्ले, १०८ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसर आणि ४५२० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. फोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३९,९९९ रुपये आणि ८ जीबी रॅम/२५६ जीबी व्हेरिएंटची किंमत ४१,९९९ रुपये आहे.
Mi 11X 5G
Mi 11X 5G स्मार्टफोनवर १५ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. याशिवाय एसबीआय क्रेडिट कार्डवर २ हजार रुपये इंस्टंट डिस्काउंट मिळते. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८७० प्रोसेसर, १२० हर्ट्ज डिस्प्ले, ४५२० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. Mi 11X 5G स्मार्टफोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजची किंमत २९,९९९ रुपये, ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३१,९९९ रुपये आहे.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lpO8Zx