Full Width(True/False)

पॉवरफुल प्रोसेसरसह येणारा रियलमीचा ‘हा’ फोन स्वस्तात खरेदीची संधी, मिळेल ३ हजार रुपये डिस्काउंट

नवी दिल्ली : स्मार्टफोनला स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. फ्लिपकार्टवर हा फोन डिस्काउंटसह उपलब्ध आहे. ही सूट कार्ड ऑफरवर मिळेल. GT 5G ३ हजार रुपये डिस्काउंटसह उपलब्ध आहे. वाचा: ही ऑफर स्मार्टफोनच्या दोन्ही व्हेरिएंट्सवर उपलब्ध आहे. याचे बेस व्हेरिएंट ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजसह येते. तर टॉप व्हेरिएंटमध्ये १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज मिळेल. ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे एचडीएफसी बँकेचे क्रेडिट अथवा डेबिट कार्ड असणे गरजेचे आहे. Realme GT 5G ला एचडीएफसी बँकेच्या कार्डवरून व ईएमआयद्वारे खरेदी केल्यास ३ हजार रुपये डिस्काउंट मिळेल. या ऑफरचा लाभ ३१ ऑगस्टपर्यंत घेता येईल. याशिवाय कंपनी फोनवर १५ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील देत आहे. Realme GT 5G च्या ८ जीबी + १२८ जीबी व्हेरिएंटला ३७,९९९ रुपयात लाँच करण्यात आले होते. ऑफरसह फोनला ३४,९९९ रुपयात खऱेदी करू शकता. १२ जीबी + २५६ जीबी व्हेरिएंटला ४१,९९९ रुपयात लाँच करण्यात आले होते. ऑफरसह फोन ३८,९९९ रुपयात मिळेल. फोन रेसिंग येलो, डॅशिंग सिल्वर आणि डॅशिंग ब्लू रंगात येतो. फोन अँड्राइड ११ आधारित Realme UI २.० वर काम करतो. यामध्ये ३६० हर्ट्ज टच सँपलिंग रेट आणि १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह ६.४३ इंच फुल एचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये १२ जीबी रॅम आणि २५६ जीबीपर्यंत स्टोरेजसह स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसर देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी यात ६४ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि २ मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरा मिळेल. सेल्फीसाठी फ्रंटला १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. फोनमध्ये ६५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४,५०० एमएएचची बॅटरी मिळेल. गेमिंगसाठी जीटी मोड देखील दिले आहे. वाचा : वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3yy2nhP