Full Width(True/False)

अरे ही तर राधे माँ दिसतेय;रिसेप्शनचा लूक रिया कपूरला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

मुंबई : अभिनेता अनिल कपूरची धाकटी मुलगी आणि अभिनेत्री सोनम कपूरची बहिण रिया कपूरचे नुकतेच लग्न झाले. रियाने तिचा १३ वर्षांपासूनचा बॉयफ्रेंड करण बुलानीसोबतच लग्न केले. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले होते. लग्नानंतर रियाने तिच्या काही मित्रमंडळींना अलिकडेच पार्टी दिली. या पार्टीतील काही फोटो रियाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्या फोटोंमुळे रियाला खूपच ट्रोल केले जात आहे. का होतोय रिया ट्रोल रियाने तिच्या मित्रमंडळींना लग्नानंतर पार्टी दिली. या पार्टीमधील फोटो रियाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमधील रियाचा अंदाज काहींना आवडला तर काहींना तिचा हा अंदाज अजिबात आवडला नाही. अनेक युझर्सनी तिची तुलना राधे माँ हिच्याशी केली आहे. या फोटोंमध्ये सोनमने लाल रंगाचा पूर्ण बाह्यांचा टॉप घातला आहे आणि पांढ-या रंगाचा लांब स्कर्ट घातला आहे. रियाच्या या पांढ-या रंगाच्या स्कर्टवर काही अक्षरे आहेत. रिया या वेस्टर्न आऊटफिटमध्ये कपाळावर मोठी लाल रंगाची टिकली लावली आहे. तसेच केसही मोकळे सोडले आहेत. तिच्या केसांनी चेहरा झाकला गेला आहे. या फोटोंमध्ये रियाने तिच्या पायांवर अल्ता लावलेला दिसत आहे. युझर्सने केले ट्रोल रियाचा हा लूक सोशल मीडियातील युझर्सना पसंत पडला नाही. त्यांनी रियाची तुलना राधे माँ शी केली आहे. एका युझरने तर रियाच्या फोटोवर लिहिले आहे की, ' या बघा राधे माँ... जेवढे तुम्ही स्वतःला चांगले दाखवता तेवढेच तुम्ही मुर्ख दिसता...' तर अन्य एका युझरने लिहिले आहे की, 'तुम्ही छान दिसत आहात.. परंतु शक्य असेल तर केसांना बांधा...'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3myGVXH