नवी दिल्ली : स्मार्टफोन अलीकडेच युरोपमध्ये लाँच करण्यात आला होता. आणि आता लवकरच स्मार्टफोनची एन्ट्री भारतात होईल अशी अपेक्षा वर्तविण्यात येत आहे. पण, लाँचच्या आधीच करण्यापूर्वी, टीपस्टर अभिषेक यादवने A52S 5G ची किंमत लीक केली आहे. वाचा: टिपस्टरच्या ट्विटनुसार, गॅलेक्सी A52S भारतात दोन प्रकारांमध्ये उपलब्ध केले जाईल. हँडसेट ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजमध्ये आणला जाऊ शकतो. लीकवरून असे दिसते की, दोन्ही हँडसेट अनुक्रमे ३५,९९९ आणि ३७,४९९ रुपयांमध्ये लाँच केले जातील. युरोप मध्ये, Galaxy A52S 5G स्मार्टफोन ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज मध्ये लाँच करण्यात आला आहे. सॅमसंग इंडियाने अद्याप Galaxy A52S 5G लाँच करण्याचे नक्की केले नाही. अशात कंपनी या महिन्यात किंवा सप्टेंबरमध्ये फोन कधी लाँच करेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. Samsung Galaxy M52 5G आणि Samsung Galaxy F42 5G स्मार्टफोन देखील दक्षिण कोरियाच्या कंपनीकडून पुढील महिन्यात लाँच केले जाऊ शकतात. Samsung Galaxy A52S मध्ये ६.५ इंच फुलएचडी + एस-अमोलेड स्क्रीन देण्यात आली आहे. स्क्रीनचा रिफ्रेश रेट १२० Hz आहे. फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट आहे. हँडसेटमध्ये मागील बाजूस क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये ६४ मेगापिक्सलचा प्राथमिक, १२ मेगापिक्सेलचा सुपरवाइड,५ मेगापिक्सेलचा मॅक्रो आणि २ मेगापिक्सेलचा डेप्थ लेन्स आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ७७८G मध्ये ४५०० mAh ची बॅटरी आहे जी २५ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यात अँड्रॉइड ११ आधारित वनयूआय ३.१ स्किन, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आणि आयपी ६७ सर्टिफिकेशन सारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. वाचा : वाचा: : वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2WvepLN