नवी दिल्ली : इनफिनिक्सने आपला बहुप्रतिक्षित Infinix Smart 5A ला अखेर लाँच केले आहे. कंपनीने या स्मार्टफोनला एंट्री-लेव्हल सेगमेंटमध्ये सादर केले आहे. फोनमध्ये ६.५२ इंच एचडी+ ड्रॉप नॉच डिस्प्ले, डीटीएस सराउंड साउंड, फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट सारखे फीचर्स आहेत. स्मार्टफोनच्या किंमत आणि फीचर्सविषयी जाणून घेऊया. वाचाः Infinix Smart 5A: किंमत व उपलब्धता स्मार्ट ५ए स्मार्टफोनला ६,९९९ रुपये किंमती लाँच करण्यात आले आहे. लाँच ऑफर अंतर्गत सेलच्या पहिल्या दिवशी ५०० रुपये डिस्काउंटनंतर फोन ६,४९९ रुपयात मिळेल. ९ ऑगस्टपासून फ्लिपकार्टवर फोनची विक्री सुरू होईल. हा फोन ब्लॅक, स्यान आणि ओशन व्हेव रंगात येतो. Infinix Smart 5A: स्पेसिफिकेशन्स इनफिनिक्स स्मार्ट ५ए मध्ये ६.५ इंच एचडी+ एलसीडी आयपीएस इन-सेल डिस्प्ले देण्यात आला आहे. स्क्रीनचा आस्पेक्ट रेशिया २०:९, स्क्रीन टू बॉडी रेशियो ९०.५ टक्के आहे, फोनमध्ये आय केअर मोड मिळते. यात १.८ गीगाहर्ट्ज ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो ए२० प्रोसेसर देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये २ जीबी रॅम आणि ३२ जीबी इनबिल्ट स्टोरेज मिळते. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डद्वारे २५६ जीबीपर्यंत वाढवू शकता. कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यामध्ये ८ मेगापिक्सल ड्यूल एआय आणि डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. यात ट्रिपल एलईडी फ्लॅश, पिक्रच मोड, ऑटो सीन डिटेक्शन, कस्टम बोकेह आणि एआय ३डी ब्यूटी सारखे मोड्स मिळतात. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. इनफिनिक्स स्मार्ट ५ए मध्ये पॉवरसाठी ५००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात ४G VoLTE, वाय-फाय ८०२.११ ए/बी/जी/एन, जीपीएस, जीपीआरएस सारखे फीचर्स मिळतील. हँडसेट अँड्रॉइड ११ आधारित XOS ७.६ वर काम करतो. यामध्ये फिंगरप्रिंट सेंसर, अँबिएंट लाइट सेंसर, जी-सेंसर आणि प्रॉक्सिमिटी सेंसर देण्यात आले आहे. फोनचे वजन १८३ ग्रॅम आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/37gzEmk