Full Width(True/False)

'द कपिल शर्मा शो' मध्ये सुमोनाबद्दल अर्चना पूरन सिंग म्हणाली..

मुंबई : प्रदीर्घ कालखंडानंतर '' पुन्हा एकदा चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. या कार्यक्रमाचा पहिला भाग येत्या २१ ऑगस्ट रोजी प्रसारित होणार आहे. कपिल शर्माचा हा कार्यक्रम सोनी टीव्हीवर इंडियन आयडल १२ च्या जागी सुरू होणार आहे. या कार्यक्रमामध्ये कपील शर्मा, कृष्णा अभिषेक, सुदेश लहरी, भारती सिंग, किकू शारदा दिसणार आहेत. तर परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. कार्यक्रमाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून पहिल्या दोन भागांचे चित्रीकरणही झाले आहे. या कार्यक्रमात कपीलच्या बायकोची भूमिका साकारायची. परंतु सध्या ती या कार्यक्रमात दिसत नाही. त्यामुळे तिचे चाहते नाराज झाले आहेत. सुमोनाला कार्यक्रमातून काढून टाकण्यात आल्याचीही चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अर्चाना यांनी या चर्चा चुकीच्या असल्याचे मुलाखतीत सांगितले आहे. त्यामुळे सुमोनाच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. काय म्हणाली अर्चना पूरन सिंगद शो मध्ये सुमोना चक्रवर्ती नसल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सातत्याने होत आहेत. या चर्चांना अर्चना यांनी पूर्णविराम दिला आहे. त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले की, 'अनेकांना असे वाटत आहे की, सुमोना या कार्यक्रमात सहभागी होणार नाही. तर मला तुम्हा सगळ्यांना सांगायचे आहे की लवकरच तुम्हाला एक मोठ सरप्राईज मिळणार आहे. सुमोना या कार्यक्रमात दिसणार आहे परंतु ती एकदम हटक्या भूमिकेत दिसणार आहे. आपल्या सर्वांची लाडकी सुमोनाच असणार आहे.' अर्चनाने पुढे सांगितले की, 'सध्याच्या पर्वामध्ये केवळ सुदेश लहरी हा एकमेव नवीन कलाकार आहे. बाकी सर्व कलाकार जुनेच आहेत. कार्यक्रमाचा सेटही पूर्णपणे नवीन आहे. कपिल शर्माच्या या कुटुंबामध्ये काही नवीन सदस्य सहभागी झाले आहेत.' दरम्यान, काही दिवसांपूर्वी कपिलने कार्यक्रमाच्या नवीन सेटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या कार्यक्रमाचा प्रोमोही रिलीज झाला आहे. यात कृष्णा अभिषेक, सुदेश लहरी, भारती सिंग, किकू शारदा आणि चंदन प्रभाकर दिसले होते. यामध्ये सुमनो चक्रवर्ती न दिसल्याने तिच्या चाहत्यांमध्ये नाराजी होती. त्या पार्श्वभूमीवर सुमोनानेदेखील याबाबत एक पोस्ट तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. त्यामध्ये तिने सांगितले होते की, 'सध्या तिच्याकडे काहीही काम नाही. तिच्याकडे घर चालवण्याइतके पैसे आहेत. पण आता कामाची गरज आहे.' त्याआधी सुमोनाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये सांगितले की, तिला एंडोमेट्रियोसिस या आजाराने ग्रासले आहे. १० वर्षांपासून ती या आजाराशी लढते आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/37DM7kn