Full Width(True/False)

त्या रात्री अमिताभ बच्चन उपाशी झोपले...;रुमी जाफरी यांनी सांगितला किस्सा

मुंबई :शिस्तबद्ध, वेळेचे पक्के, कामात चोख, विनम्र अशी सगळी विशेषणं ज्यांना लागू होतात ते म्हणजे इंडस्ट्रीतले शहेनशाह अर्थात अभिनेते . तरुणांना लाजवेल इतकं काम ते आजही करताहेत. एका वेळी अनेक कामांमध्ये व्यग्र असलेले अमिताभ सगळीकडे चोख कामगिरी करतात. त्यांचा '' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. सिनेमाचं आणि त्यांच्या अभिनयाचं कौतुकही झालं. या सिनेमाच्या चित्रीकरणाच्या वेळचा एक किस्सा दिग्दर्शक यांनी सांगितला. पोलंड येथे एका डोंगरावरील रिसॉर्टवर चित्रीकरण सुरू होतं. त्यावेळची एक आठवण रुमी यांनी सांगितली. ते म्हणाले, 'एक दिवस माझ्या बायकोनं अमिताभ आणि आनंद यांच्यासाठी जेवण बनवते असं मला सांगितलं. आम्ही ते त्या दोघांनाही कळवलं. मी आणि बायकोनं असं ठरवलं की चित्रीकरण संपलं की जेवण बनवून त्यांच्याकडे पाठवायचं. ते ७.३० वाजता जेवतात म्हणून आम्ही ते वेळेवर पाठवलं. पण त्यांच्यापर्यंत जेवण पोहोचलंच नाही. तेव्हा लक्षात आलं की आम्ही पाठवलेला ड्राइव्हर रस्त्यावर बर्फ पडल्यामुळे अडकला आहे. दुसरीकडे अमिताभ यांनी त्यांच्या हॉटेलमध्ये त्यांचं जेवण बनवायला सांगितलं नव्हतं. तसंच तिथे फार थंडी असल्यामुळे सगळे हॉटेल्सही बंद झाले होते. त्यादिवशी ते उपाशी पोटीच झोपले. त्यांना विचारलं तर ते म्हणाले की 'हरकत नाही.. तुमच्या हातचं जेवणं हे माझ्या नशिबात नव्हतं.' पण याबद्दल मला अपराधी वाटलं.' एवढं असूनही बिग बी यांनी कसलीही तक्रार केली नाही याबद्दल त्यांचं रुमी यांना कौतुक वाटतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3BldM6v