नवी दिल्ली : करोना संकटाच्या काळात घरातच असल्याने अशा स्थितीमध्ये लोकांना आधी केलेली बचतच कामी आली. अनेकांनी या काळात सेविंग्स करणे सुरू केली आहे. वारंवार बँका आणि पोस्ट ऑफिसच्या चक्करा माराव्या लागतील म्हणून अनेकजण (एफडी) करणे टाळतात. मात्र, तुम्ही घर बसल्या देखील करू शकता. यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही. वाचा: लवकरच बँकांप्रमाणे फिक्स्ड डिपॉजिट स्कीम सुरू करणार आहे. गुगलने ही सुविधा सुरु केल्यास यूजर्सला नक्कीच फायदा होईल. यामुळे यूजर्सला बँकेची वेबसाइट अथवा अॅपवर जाण्याची गरज नाही. ग्राहक थेट वर करू शकतात. गुगलने यासाठी फिनटेक कंपनी सोबत भागीदारी केली आहे. रिपोर्टनुसार, सेतुचे API असून, याद्वारे भारतीय ग्राहकांना या स्कीमचा लाभ मिळेल. विशेष म्हणजे गुगल स्वतः एफडी स्कीम सुरु करणार नाही, तर बँकांच्या एफडी स्कीम्सला प्रमोट करेल. ही सेवा सुरु झाल्यावर सर्वात प्रथम इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेच्या एफडी स्कीम्सचा लाभ घेता येईल. किती मिळेल व्याज ग्राहकांना या एफडी स्कीममध्ये जास्तीत जास्त ६.३५ टक्के व्याज मिळेल. हे एक वर्षासाठी दिले जाईल. गुगल पे द्वारे यूजर्स इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेच्या एफडी स्कीम्समध्ये ७-२९ दिवस, ३०९-४५ दिवस, ४६-९० दिवस, ९१-१८० दिवस, १८१-३६४ दिवस आणि ३६५ दिवसांसाठी गुंतवणूक करू शकतात. KYC गरजेचे KYC शिवाय एफडी करता येणार नाही. यासाठी ग्राहकांना आधार नंबर देऊन केवायसी करावे लागेल. जो नंबर आधारशी लिंक असेल त्यावरच ओटीपी येईल. सेतुने API साठी बीटा व्हर्जन तयार केले आहे. गुगल आणि अनेक दिवसांपासून यावर काम करत असून, लवकरच ही सेवा लाँच केली जाईल. एफडी मॅच्यूर झाल्यानंतर ग्राहकांचे पैसे गुगल पे अकाउंटमध्ये ट्रांसफर केले जाईल. या बँकांमध्ये देखील करता येईल गुंतवणूक इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेशिवाय गुगल उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक आणि एयू स्मॉल फायनान्स बँकेशी देखील चर्चा करत आहे. या बँकांमध्ये देखील एफडीची सुविधा उपलब्ध होऊ शकते. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2US76x7