नवी दिल्लीः फ्लिपकार्टने पुन्हा एकदा Big Saving Days सेलची घोषणा केली आहे. तारखेवरून फ्लिपकार्टने अजून काही स्पष्ट केले नाही. परंतु, याचा एक बॅनर लावला आहे. या बॅनरवर कमिंग सून लिहिले आहे. सेल दरम्यान, कंपनीच्या अनेक प्रोडक्ट्सवर डील्स आणि डिस्काउंट देण्यात येणार आहे. याशिवाय, काही बँकेच्या कार्ड होल्डरला एक्स्ट्रा डिस्काउंट मिळणार आहे. वाचाः Flipkart Big Saving Days सेल मध्ये Axis आणि ICICI बँकेच्या कार्ड होल्डरला सेल दरम्यान, १० टक्के एक्स्ट्रा डिस्काउंट दिला जाणार आहे. आधी नुकताच फ्लिपकार्ट बिग सेविंग डेज सेलचे आयोजन करण्यात आले होते. या सेलला पुन्हा एकदा आणले जाणार आहे. यावरून कंपनीने अधिकृत तारखेची घोषणा केलेली नाही. परंतु, गुगल सर्च केल्यानंतर याच्या एसईओ टायटल वरून याची माहिती समोर आली आहे. वाचाः एसईओ टायटलनुसार, बिग सेविंग डेज सेल ६ ऑगस्ट पासूस सुरू करण्यात येणार आहे. हा सेल १० ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार आहे. Flipkart Plus Members या डिल्सला २४ तास आधी अॅक्सेस मिळू शकेल. Flipkart Big Saving Days सेलसाठी एक मायक्रोसाइट सुद्धा बनवण्यात आली आहे. या मायक्रोसाइटच्या माहितीनुसार, यात क्रेझी डिल्स स्पेशल झोन्स सुद्धा असतील. हा १२ वाजता, ८ वाजता, आणि ४ वाजता रिफ्रेश असेल. याशिवाय, दुसऱ्या झोन्स मध्ये अवर्स आणि टिक टॉक डिल्सचा समावेश आहे. वाचाः बाय मोर, सेव्ह मोर ऑफर मध्ये डिस्काउंट सोबत अतिरिक्त फ्री प्रोडक्ट्स दिले जाणार आहे. सेल दरम्यान, कंपनी मोबाइल्स, टॅबलेट्सवर ऑफर देणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि अॅक्सेसरीजवर ८० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट दिला जाणार आहे. टीव्ही आणि अप्लायन्सेजसवर ७५ टक्क्यांपर्यंत ऑफर कंपनी देणार आहे. कपड्यावर ८० टक्क्यांपर्यंत ऑफ दिला जाणार आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2VdSMPB