Full Width(True/False)

Motorola Edge 20 च्या खरेदीसाठी पाहावी लागणार वाट, कंपनीने पुढे ढकलला सेल

नवी दिल्ली : आणि स्मार्टफोन्सला काही दिवसांपूर्वीच भारतात लाँच करण्यात आले आहे. स्मार्टफोनचा २४ ऑगस्ट, तर सेल २७ ऑगस्टपासून २७ ऑगस्टपासून सुरू होणार होता. मात्र, कंपनीने आता मोटो एड्ज २० सेल पुढे ढकलला असून, लवकरच नवीन तारखेची घोषणा केली जाईल. वाचा: मोटोरोलाने मोटो एड्ज२० सेल पुढे ढकलण्यात आल्याची माहिती दिली आहे. आता हँडसेटची २४ ऑगस्टपासून विक्री होणार नाही. मोटोरोलाने म्हटले आहे की, २४ ऑगस्टपासून फ्लिपकार्टवर स्मार्टफोनची प्री-ऑर्डर सुरू होईल. लवकरच सेल डेटची देखील घोषणा केली जाईल. दरम्यान, मोटोरोला एड्ज २० फ्यूजन स्मार्टफोनला २७ ऑगस्टला दुपारी १२ वाजल्यापासून फ्लिपकार्ट आणि मोठ्या रिटेल स्टोर्सवर खरेदी करू शकता. मोटोरोला एड्ज २० ला भारतात २९,९९९ रुपयात लाँच करण्यात आले आहे. फोन फॉस्टेड पर्ल आणि फ्रॉस्टेड एमरेल्ड रंगात येतो. मोटोरोला एड्ज २० फ्यूजनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २१,४९९ रुपये, ८ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २२,९९९ रुपये आहे. फोन साइबर टील व इलेक्ट्रिक ग्रेफाइट रंगात खरेदी करू शकता. Motorola Edge 20: स्पेसिफिकेशन्स Edge 20 स्मार्टफोनमध्ये ६.७ इंच फुलएचडी+ ओलेड मॅक्स व्हिजन डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन ७७८जी प्रोसेसर आणि ८ जीबी रॅम मिळेल. फोन अँड्राइड ११ आधारित MyUX स्किन वर काम करतो. यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला असून, याचा प्राइमरी कॅमेरा १०८ मेगापिक्सल, दुसरा ८ मेगापिक्सल आणि १६ मेगापिक्सलची अल्ट्रा-वाइड लेंस आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी २० मेगापिक्सल फ्रंट सेंसर मिळेल. पॉवरसाठी यामध्ये ३० वॉट टर्बोपॉवर फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये ५G, ४G LTE, वाय-फाय ६, ब्लूटूथ ५.१, जीपीएस/ए-जीपीएस, एनएफसी आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे फीचर्स मिळतील. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3D8BpRg