Full Width(True/False)

अशी संधी पुन्हा मिळणार नाही ! भारतात Apple MacBook Air M1 वर मिळतेय 'इतक्या' हजारांची सूट, पाहा ऑफर्स

नवी दिल्ली: गेल्या वर्षी, M1 चिपसह ला उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह लाँच करण्यात आले होते. पण, त्याच्या किंमतीमुळे, बरेच लोक ते खरेदी करण्याचा विचारही करू शकत नव्हते. पण आता तुमच्याकडे चांगली संधी आहे. सध्या Apple MacBook Air M1 मोठ्या प्रमाणात सूट ऑफर करत आहे. अॅपल रिसेलर माय इमॅजिन स्टोअर नवीन मॅकबुक एअरवर अनेक डील्स ऑफर करत आहे, ज्यामुळे किंमत ८२,९०० रुपयांपर्यंत कमी होईल . आणि तुम्ही बेस्ट डीलचा लाभ घेऊ शकाल. वाचा: Apple MacBook Air M1 गेल्या वर्षी लाँच Apple MacBook Air M1 ला मागील वर्षी ९२,९०० रुपयांमध्ये लाँच करण्यात आले होते. आता ऑफर डील मध्ये तुम्ही कमी पैशात ते खरेदी करू शकता. एचडीएफसी बँक कार्डवर रिसेलर तुम्हाला ६००० चा फ्लॅट कॅशबॅक देखील देत आहे. एवढेच नाही तर जर तुमच्याकडे आता इतके पैसे खर्च करण्याचे बजेट नसेल आणि तुम्हाला ते खरेदी करायचे असेल तर तुम्ही एचडीएफसी बँक कार्डवर ईएमआय ऑफरचा सहजपणे लाभ घेऊ शकता. यासह,६,००० रुपयांच्या कॅशबॅक ऑफरचा लाभ घेता येईल. युजर्ससाठी चांगली संधी: Apple MacBook Air M1 ची प्रभावी किंमत ८२,९०० रुपये आहे ज्यात एचडीएफसी बँक कॅशबॅक आणि ४,००० रुपयांची फ्लॅट सवलत समाविष्ट आहे. याचा अर्थ की, या डीलमध्ये तुम्हाला कॅशबॅक तसेच प्लॅट डिस्काउंटची ऑफर मिळत आहे. कॉम्बो ऑफरचा लाभ देखील घेऊ शकता: या व्यतिरिक्त, पुनर्विक्रेता तुम्हाला एक कॉम्बो ऑफर देखील देत आहे जो MacBook Air M1 ची किंमत ७३,९०० रुपयांपर्यंत कमी करण्याचा दावा करतो. यात तब्बल ९,००० रुपयांची अतिरिक्त सूट मिळू शकते. या कॉम्बो ऑफर अंतर्गत MacBook Air M1 ग्राहक १३,००० रुपयांचे लॅपटॉप बॅग आणि ब्लूटूथ स्पीकर मोफत मिळवू शकतात. काय आहे कॉम्बो डील ? आता कॉम्बो डील कसे काम करते हे देखील जाणून घेऊया. यासाठी, ग्राहक HDFC बँक कार्डवर ६,००० रुपयांचा कॅशबॅक घेऊ शकतात आणि नंतर १३,००० रुपयांच्या वस्तू घेण्यासाठी कॉम्बो ऑफर निवडू शकतात. या डीलमध्ये एकापेक्षा जास्त सूट देखील मिळतील. एवढेच नाही तर तुम्हाला ऑफरमधील वस्तूच्या किंमतीच्या बरोबरीने इतर वस्तू देखील मिळू शकतात. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3sErr5j