Full Width(True/False)

OnePlus Buds Pro वायरलेस इयरबड्स भारतात लाँच, डिव्हाइस ANC सह अनेक Premium वैशिष्ट्यांनी सुसज्ज, पाहा किंमत

नवी दिल्ली: OnePlus ने भारतात त्याचे प्रीमियम इयरबड्स OnePlus Buds Pro लाँच केले असून या वायरलेस इयरबड्सची किंमत ९,९९० रुपये आहे. इयरबड्सची विक्री २६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता सुरू होईल. तुम्हाला वनप्लस बड्स प्रो कंपनीच्या स्टोअर आणि Amazon इंडियावरून वनप्लसच्या वेबसाइटसह खरेदी करता येईल. हे व्हाईट आणि मॅट ब्लॅक अशा दोन कलर व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. वाचा: OnePlus Buds Pro मध्ये Active Noise Cancellation वैशिष्ट्य देण्यात आले आहे. कंपनीच्या मते, यात अॅडव्हान्स अॅडॅप्टिव्ह नॉइस कॅन्सलेशन सपोर्ट आहे जो ४० डीबी पर्यंत आवाज कमी करू शकतो. OnePlus Buds Pro मध्ये अनेक प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत. व्यतिरिक्त, त्यात कमी विलंब एलएचडीसी ऑडिओ कोडेक आहे. कंपनीने हे इयरबड्स आधीच जागतिक स्तरावर लाँच केले होते जे आता ते भारतात आणले जात आहे. OnePlus Buds Pro च्या एका इयरबडचे वजन ४.३४ ग्रॅम आहे. चार्जिंग केसबद्दल सांगायचे तर, ते ५२ ग्रॅम आहे, इअरबड्समध्ये तीन माइक देण्यात आले आहेत, ज्यामुळे आवाजाची गुणवत्ता सुधारेल आणि सभोवतालचा आवाज अतिशय कमी असेल. OnePlus Buds Pro मध्ये ११ nm ड्रायव्हर्स वापरण्यात आले आहेत. जे एएनसी चालू करूनही ती पाच तासांचा बॅकअप देईल असा कंपनीचा दावा आहे. जर तुम्हाला अधिक बॅटरी बॅकअप हवा असेल, तर Active Noise Cancellation बंद करावे लागेल. यानंतर, ७ तासांपर्यंतचा बॅटरी बॅकअप मिळविता येईल . चार्जिंग केससह तुम्ही OnePlus Buds Pro ३१ तास चालवू शकता . विशेष म्हणजे तुम्ही रॅप चार्जिंग द्वारे १० मिनिटे चार्ज करून १० तास बॅटरी बॅकअप मिळवू शकता ,असा कंपनीचा दावा आहे. हे वायरलेस चार्ज देखील करू शकते. OnePlus Buds Pro मध्ये आयपीएक्स ५ रेटिंग आहे ज्यामुळे ते पाणी आणि धूळप्रूफ बनते. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये ब्लूटूथ ५.२ देण्यात आला आहे. हे अँड्रॉइड किंवा आयफोनसह देखील कनेक्ट केले जाऊ शकते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/388V0CE