Full Width(True/False)

८ सप्टेंबरला लाँच होतोय Samsung Galaxy S21 FE फोन, फीचर्स झाले लीक

नवी दिल्लीः स्मार्टफोनच्या लाँच डेट पुन्हा एकदा लीक झाली आहे. याआधी या फोनला ऑगस्ट मध्ये लाँच करण्यात येणार होते. परंतु, पार्ट्सची कमी मुळे लाँचिंग पुढे ढकलण्यात आली होती. परंतु, आता ताज्या रिपोर्ट्सनुसार सॅमसंग गॅलेक्सी S21 FE स्मार्टफोनला सप्टेंबर महिन्यात लाँच केले जावू शकते. या फोनची डिझाइन आणि स्पेसिफिकेशन आधीच समोर आली आहेत. जाणून घ्या डिटेल्स. यूट्यूबर आणि टिपस्टर Mauri QHD ने ट्वीट करून सांगितले की, Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोन ८ सप्टेंबर रोजी लाँच करण्यात येणार आहे. टिपस्टरला ही माहिती अशा सोर्सकडून मिळाली आहे जो सॅमसंगच्या एका कर्मचाऱ्याच्या संपर्कात होता. त्यामुळे अपेक्षा व्यक्त केली जात आहे की, फोनची किंमत आणि उपलब्धता लवकरच उघडकीस येईल. Samsung Galaxy S21 FE चे स्पेसिफिकेशंस सॅमसंग गॅलेक्सी एस २१ एफई स्मार्टफोन मे महिन्यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८८८ चिपसेट, ६ जीबी रॅम आणि अँड्रॉयड ११ सोबत गीकबेंचवर दिसला होता. जून मध्ये फोनला ८ जीबी रॅम व्हेरियंट मध्ये पाहिले होते. FCC लिस्टिंगनुसार, स्मार्टफोन 45W फास्ट चार्जिंग सोबत येवू शकतो. परंतु, इतकी चार्जिंग कॅपिसिटी मिळण्याची शक्यता कमीच आहे. विश्वसनीय रेंडरर्सकडून माहिती झाले की, सॅमसंग गॅलेक्सी S21 FE च्या डिस्प्लेत पंच होल कॅमेरा आणि एक रॅक्टांगुलर रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. रियर कॅमेरात तीन सेन्सर दिले जावू शकते. याचा प्रायमरी सेन्सर ३२ मेगापिक्सलचा असू शकतो. याचा फ्रंट कॅमेरा १२ मेगापिक्सलचा असू शकतो. या फोनची डिझाइन फ्लॅगशीप सॅमसंग गॅलेक्सी S21 सारखी असू शकते. सॅमसंग गॅलेक्सी एस २१ एफई गुगल प्ले कंन्सोल वेबसाइटवर दिसत होता. यावरून या फोनला स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसर, अँड्रॉयड १११ ऑपरेटिंग सिस्टम, FHD+ डिस्प्ले आणि ६ जीबी रॅमची माहिती उघड झाली होती. वाचा: वाचा : वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3Bpxvlj