नवी दिल्ली: डिजिटल फसवणुकीची प्रकरणे दिवसेंदिवस वाढतच आहे . सरकार आणि बँकांच्या अनेक चेतावणीनंतरही अनेक जण या डिजिटल फसवणुकीला बळी पडतात. असेच एक प्रकरण समोर आले आहे, ज्यात एका २७ वर्षीय महिलेला सायबर फसवणूकीने कथितरीत्या ३ लाख रुपयांची फसवणूक केली. फसवणूक करणाऱ्या महिलेने तिला वचन दिले होते की तिला अग्रगण्य ऑनलाइन शॉपिंग पोर्टलवर बक्षीस दिले जाईल. जाणून घेऊया काय आहे संपूर्ण प्रकरण. काय आहे प्रकरण : कांदिवलीमध्ये राहणाऱ्या एका इंटिरिअर डिझायनर महिलेने गेल्या आठवड्यात चारकोप पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली होती, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. महिलेने सांगितले की तिला व्हॉट्सअॅपवर एक लिंक मिळाली, जिथे तिला काही कामं देण्यात आली होती. ही कामं पूर्ण केल्यानंतर, अग्रगण्य ऑनलाइन शॉपिंग पोर्टलच्या नावाने बक्षीस देण्याचे आश्वासन सुद्धा देण्यात आले होते. महिलेने त्या लिंकवर क्लिक केलेच. कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये असे वारंवार सांगून देखील लिंकवर क्लिक केल्यानंतर, त्याला/तिला युजर आयडी आणि पासवर्ड तयार करण्यास सांगितले गेले. त्यांनी त्यांचे खाते तयार केले आणि बक्षीस म्हणून ६४ रुपये मिळाले. यानंतर त्यांना रिचार्जिंगचे आणखी एक काम देण्यात आले. हे काम पूर्ण केल्यानंतर त्यांना पुन्हा बक्षीस मिळाले. त्यानंतर त्या महिलेला अधिक बक्षिसे मिळवण्यासाठी अधिक पैसे जमा करण्यास सांगण्यात आले. महिलेने उर्वरित कामांसाठी ३.११ लाख रुपये जमा केले. पण, यावेळी मात्र त्या बदल्यात महिलेला काहीच मिळाले नाही. अधिकारी म्हणाले की, पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात आयपीसीच्या कलम ४२० (फसवणूक) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित तरतुदीनुसार एफआयआर नोंदवली असून प्रकरणाची चौकशी सुरु आहे. ऑनलाइन फसवणूक कशी टाळावी: तुमचा पासवर्ड, पिन नंबर किंवा बँक खाते क्रमांक कोणालाही देऊ नका. कायदेशीर कंपन्या आणि बँका तुम्हाला ई-मेल किंवा फोनवरून हे तपशील विचारत नाहीत. जर तुम्ही बाहेर असाल आणि ऑनलाईन खरेदी करत असाल तर सार्वजनिक वाय-फाय वापरू नका. फक्त तुमचा स्वतःचा डेटा वापरा. डेबिट कार्डऐवजी क्रेडिट कार्ड आणि सुरक्षित पेमेंट सेवा वापरा. पैसे हस्तांतरित करताना विश्वसनीय कंपन्यांचा वापर करा. इतर कोणासाठीही कधीही पैसे हस्तांतरित किंवा प्राप्त करू नका. कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका. तपासाशिवाय कोणत्याही सेवेत पैसे गुंतवू नका. शॉपिंग-ब्राउझिंग इत्यादींसाठी नेहमी विश्वसनीय किंवा सुरक्षित साइट वापरा. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3DnVOCb