Full Width(True/False)

'लागीरं झालं जी' फेम शिवानी बावकर आता भेटणार नव्या भूमिकेत

मुंबई- छोट्या पडद्यावर प्रचंड गाजलेली मालिका 'लागीरं झालं जी' मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शिवानीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. शिवानीने शीतली होऊन प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची छाप पाडली. आता शिवानी पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. सोनी मराठी वाहिनीवरील नवी कोरी मालिका '' मध्ये शिवानी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. नुकताच या मालिकेचा पहिला प्रोमो वाहिनीतर्फे प्रदर्शित करण्यात आला आहे. 'कुसुम' मालिकेत एका सर्वसामान्य मुलीची कथा दाखवण्यात येणार आहे. जी आपलं सासर आणि माहेर या दोन्हीची जबाबदारी समर्थपणे पेलणार आहे. मुलीचं लग्न झालं म्हणजे तिचं सासर हेच तिचं घर असतं अशी सर्वसाधारण मानसिकता समाजात पाहायला मिळते. लग्न झाल्यावर माहेरची जबाबदारी मुलींची नसते, असं मानलं जातं. परंतु, कुसुम या सर्व मान्यतांना मोडीत काढत सासरसोबत आपल्या आईवडिलांची जबाबदारीही घेताना दिसणार आहे. आपलं लग्न झाल्यावर भावावर आई- वडिलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी देऊन मोकळं का व्हायचं, असा प्रश्न जणू कुसुम समाजाला विचारत आहे. प्रोमो पाहून शिवानीचे चाहते खुश झाले असून प्रेक्षकही मालिकेची आतुरतेने वाट पाहू लागले आहेत. एक नवी संकल्पना घेऊन शिवानी प्रेक्षकांसमोर येणार आहे. 'कुसुम' ही मालिका सोनी हिंदी वाहिनीवरील मालिका 'कुसुम' चा रिमेक असणार आहे. तर लोकप्रिय दिग्दर्शक- निर्माती एकता कपूर या मालिकेची निर्मिती करत आहे. या नव्या भूमिकेतून शिवानी पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकून घेईल यात दुमत नाही.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3mD3rhZ