Full Width(True/False)

5G च्या शर्यतीत Nokia ची धमाकेदार एन्ट्री, लाँच केला बजेट स्मार्टफोन Nokia G50, पाहा किंमत -फीचर्स

नवी दिल्ली : लोकप्रिय स्मार्टफोन निर्माता Nokia HMD ग्लोबल ने लेटेस्ट फीचर्सने परिपूर्ण असा स्मार्टफोन नुकताच लाँच केला आहे. हा फोन वॉटरड्रॉप डिस्प्ले नॉच आणि तीन मागील कॅमेऱ्यांसह सादर करण्यात आला असून यात इतरही काही भन्नाट फीचर्स देण्यात आली आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे या फोनची किंमत अतिशय कमी आहे. पाहा डिटेल्स. वाचा: Nokia G50 डिस्प्ले : या Nokia मोबाईल फोनमध्ये ६.८२ इंच एचडी + डिस्प्ले आहे. फोन ४५० निट्स पीक ब्राइटनेससह येतो. Nokia G50: प्रोसेसर, रॅम आणि स्टोरेज: स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४८० प्रोसेसरसह ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज ५१२ जीबी पर्यंत वाढवणे शक्य आहे. Nokia G50: कनेक्टिव्हिटी: 5G, 4G LTE, ब्लूटूथ व्हर्जन 5, USB Type-C पोर्ट, NFC, GPS, A-GPS, Wi-Fi 802.11 AC सपोर्ट फोनमध्ये देण्यात आला आहे. तसेच, सुरक्षेसाठी फोनच्या बाजूला फिंगरप्रिंट सेन्सर आहे. Nokia G50 : कॅमेरा: या स्मार्टफोनच्या मागील पॅनलवर तीन मागील कॅमेरे देण्यात आले आहेत. ४८ मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा, ५ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा सेन्सर. तर, सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर यात आहे. Nokia G50: बॅटरी: फोनला पॉवर देण्यासाठी ५००० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी १८ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Nokia G50 : किंमत : या नवीन मोबाईल फोनच्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत जीबीपी १९९.९९ (सुमारे २०,१०० रुपये) असून फोन मिडनाइट सन आणि ओशन ब्लू या कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3zFncIU