Full Width(True/False)

BBM 3 - मिनल शाहला 'रोडीज'चा अनुभव तारणार का?

मुंबई : मॉडेल म्हणून लोकप्रिय असलेली छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अशा बिग बॉस मराठीच्या तिस-या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. मूळची अहमदाबाद येथे असलेल्या मिनलचा जन्म मुंबईत १८ एप्रिल रोजी १९९२ मध्ये झाला. मिनलने तिचे संपूर्ण शिक्षण मुंबईत घेतले. तिने बायटेक्नॉलॉजीमध्ये मास्टर्स केले आहे. मिनल मॉडेलिंग करत असली तरी तिने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. त्याचप्रमाणे हिंदीमधील अनेक रिअॅलिटी कार्यक्रमात सहभागी झाली आहे. मिनलने गँग ऑफ लिडर प्रिन्स नरुला मध्येही काम केले होते.मिनलला खरी ओळख मिळाली ती लोकप्रिय कार्यक्रम असलेल्या 'रोडिज'च्या २०१७ मध्ये झालेल्या स्पेशल रायझिंग स्टार कार्यक्रमामुळे. त्यात ती सर्वात लोकप्रिय स्पर्धक म्हणून ओळखली गेली होती. अर्थात सेमी फायनलही ती विजयी होऊ शकली नाही. मिननला नृत्याचीही आवड आहे. मिनल नानचाकू आणि मटेरिअल आर्टमध्ये पारंगत आहे. मिनलचे स्वतःचे युट्यूब चॅनेल आहे. त्याठिकाणी तिने तिची रोडीजचा प्रवास व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केला आहे. मिनलचा स्वभाव आक्रमक आणि काहीसा हट्टी आहे. त्यामुळे च्या घरात ती इतर स्पर्धकांसोबत कसे जुळवून घेते आणि या स्पर्धेत परफॉर्म करते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3lMg1tt