Full Width(True/False)

BBM 3- मीरा वर भडकले मांजरेकर, म्हणाले- 'आधी ऐकायला शिक'

मुंबई : 'बिग बॉस मराठी ३' कार्यक्रम सुरू होऊन पाच दिवस झालेत. अवघ्या पाच दिवसांत बिग बॉसच्या घरात सहभागी झालेल्या सर्वच स्पर्धकांचे विविध रंगढंग समोर येऊ लागले आहेत. च्या आजच्या भागात शनिवारची चावडी रंगणार आहे. याचा व्हिडिओ वाहिनीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. चावडीवर मीरा जगन्नाथ हिची यांनी चांगलीच कानउघडणी केली आहे. काय म्हणाले महेश मांजरेकर बिग बॉसच्या घरातील स्पर्धक संतोष चौधरी अर्थात दादूस आणि अक्षय वाघमारे यांच्यात टास्क झाला. यामध्ये अक्षयने तयार केलेला पदार्थ दादूसला खायला होता. अक्षयने जिंकण्यासाठी १०० टक्के प्रयत्न केले तसेच प्रयत्न दादूसनेही केले. परंतु महिला स्पर्धकांचे एकमत न झाल्याने हा टास्क रद्द करण्यात आला. हा टास्क रद्द करण्यात मीरा आणि गायत्री यांनी घेतलेली भूमिका कारणीभूत ठरली होती. याबाबत महेश यांनी मीराला विचारणा केली. त्यावर मीराने स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. परंतु महेश यांनी तिचे काहीच ऐकून घेतले नाही. उलट ते म्हणाले की, अक्षय त्याच्यापरीने योग्य ते खेळला. आता मी बिग बॉसच्या घरात येतो आणि अक्षयने जो पदार्थ तयार करून दादूसला दिला होता, तोच मी तयार करतो आणि तुम्हाला खायला घालतो. त्यावर मीरा काही बोलण्याचा प्रयत्न करते. परंतु तिला मांजरेकर थांबवतात आणि खडसावून सांगतात की मीरा आधी तू दुसऱ्यांचं म्हणणं ऐकायला शिक. महेश यांचे हे बोलणे संपल्यानंतर घरातील इतर सदस्य टाळ्या वाजवून त्यांचे समर्थन करतात. यावेळी दादूस यांच्या डोळ्यात पाणी येते. महेश पुढे मीराला म्हणतात, बनवणे महत्त्वाचे आहे की खाणे.. त्यावर सर्वजण खाणे असे एकमुखाने उत्तर देतात. दादूसने खाणे थांबवले नव्हते. ते शेवटपर्यंत खात होते. याचेही महेश यांनी भरभरून कौतुक केले. एकूणच मीराच्या बिग बॉसच्या घरातील वर्तणुकीबद्दल महेश यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की, 'या टास्कवेळी बऱ्याच महिला स्पर्धक दादूसच्या बाजूने होत्या. परंतु मीरा तू सगळ्यांना त्यांचा निर्णय बदलायला भाग पाडलेस.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3zNmsBy