Full Width(True/False)

Vivo V23 5G सीरीज: लाँचिंगआधीच किंमत-फीचर्स सर्वकाही लीक, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः सीरीजच्या लाँचिंगची तारीख नुकतीच समोर आली आहे. या सीरीजला भारतात ५ जानेवारी रोजी लाँच केले जाणार आहे. या सीरीज अंतर्गत Vivo V23 5G आणि स्मार्टफोन्स लाँच केले जाणार आहेत. आता या सीरीजच्या लाँचिंग आधी Vivo V23 5G ची किंमत, फीचर्स आणि कलर ऑप्शन लीक झाले आहेत. जाणून घ्या Vivo V23 5G सीरीजची लीक्ड डिटेल्स. Vivo V23 5G आणि Vivo V23 Pro 5G ची संभावित किंमत लीक्सच्या माहितीनुसार, Vivo V23 असा पहिला फोन आहे. जो MediaTek Dimensity 920 SoC सोबत लाँच केला जाणार आहे. हा सनशाइन गोल्ड आणि स्टारडस्ट ब्लॅक कलर मध्ये येऊ शकतो. याची किंमत २६ हजार रुपये ते २९ हजार रुपयांपर्यंत असू शकते. Vivo V23 Pro 5G मध्ये MediaTek Dimensity 1200 SoC सोबत लाँच केले जाऊ शकते. याला सनशाइन गोल्ड आणि स्टारडस्ट ब्लॅक कलर मध्ये आणले जाऊ शकते. याची किंमत ३७ हजार पासून ४० हजार रुपयांच्या जवळपास असू शकते. Vivo V23 5G चे संभावित फीचर्स हा फोन MediaTek Dimensity 920 SoC प्रोसेसर सोबत येईल. यात 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज दिले जावू शकते. यात ६.४४ इंचाचा full-HD+ AMOLED डिस्प्ले दिला आहे. याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. फोनमध्ये 4200mAh ची बॅटरी दिली आहे. जी 44W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. या फोनमध्ये ६४ मेगापिक्सला प्रायमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेकंडरी कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा दिला आहे. सोबत फ्रंट मध्ये ८ मेगापिक्सलच्या कॅमेरासोबत ५० मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाऊ शकतो. हा अँड्रॉयड १२ सोबत येऊ शकतो. Vivo V23 Pro 5G चे संभावित फीचर्स: Vivo V23 Pro 5G ला मीडियाटेक डाइमेंशन 1200 SoC सोबत लाँच केले जाऊ शकते. यात 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज दिले जाऊ शकते. या फोनमध्ये 6.56 इंचाचा AMOLED डिस्प्ले दिला जावू शकतो. स्मार्टफोन मध्ये 44W फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत 4300mAh ची बॅटरी दिली जावू शकते. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. यात १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा दिला जावू शकतो. यात ५० मेगापिक्सलचा कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जावू शकतो. वाचाः वाचाः वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3EynTG9