Full Width(True/False)

BBM3 : एकदा नाही तर दोन वेळा मोडलाय स्नेहा वाघचा संसार

मुंबई- दणक्यात सुरू झालेल्या '' ने सोशल मीडियावर धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. घरातील सदस्यदेखील एकमेकांना समजून घेत आहेत. तर काही सदस्य एकमेकांसोबत वाद घालताना दिसत आहेत. 'बिग बॉस मराठी ३' मध्ये एका अशा अभिनेत्रीने एण्ट्री केली आहे जिने उत्तम अभिनयाच्या जोरावर मराठीच नाही तर हिंदी मालिकांमध्येही प्रचंड नाव कमावलं. मात्र आपल्या वैयक्तिक आयुष्यात ती यशस्वी होऊ शकली नाही. 'बिग बॉस मराठी ३' मध्ये सहभागी झालेली अभिनेत्री हिचा एकदा नाही तर दोनदा घटस्फोट झाला आहे. 'काटा रुते कुणाला' या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या स्नेहाने 'वीरा', 'ज्योती' यांसारख्या अनेक हिंदी मालिकांमध्ये आपला ठसा उमटवला. परंतु, वैयक्तिक आयुष्यात तिला खूप काही सहन करावं लागलं. स्नेहाने वयाच्या १९ व्या वर्षी लोकप्रिय अभिनेता सोबत विवाह केला होता. परंतु, लग्नानंतर स्नेहाला घरगुती हिंसाचाराला सामोरं जावं लागलं. लग्नाच्या काही वर्षानंतर तिने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. महत्वाचं म्हणजे आविष्कार देखील 'बिग बॉस मराठी ३' मध्ये सहभागी झाला आहे. सध्या ते दोघेही एकाच छताखाली आहेत. स्नेहाने २०१५ साली दुसरं लग्न केलं. अनुराग सोळंकी या व्यक्तीसोबतचा तिचा संसार देखील फार काळ टिकू शकला नाही. लग्नाच्या आठ महिन्यानंतर ते दोघेही वेगळे राहू लागले. अनुरागदेखील स्नेहाचा मानसिक आणि शारीरिक छळ करत असल्याचं तिने सांगितलं. आपल्या तुटलेल्या लग्नाबद्दल बोलताना स्नेहा म्हणाली, 'माझा आता लग्नसंस्थेवर विश्वास उरलेला नाही. दोन लग्न तुटल्यावर मला जाणवलं की पुरुषांना त्यांच्यापेक्षा जास्त सक्षम आणि बुद्धिमान असणाऱ्या महिला आवडत नाहीत. त्यांना महिलांवर अधिकार गाजवायला आवडतो. माझ्यासाठी माझे आईवडील सर्वकाही आहेत. मला आता लग्न करायचं नाही. मला माझ्या अभिनयावर विश्वास आहे. मला स्वतःवर विश्वास आहे.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3lDBEvQ