मुंबई- आज पंजाबचा सुपरस्टार याचा एक फोटो तुफान चर्चेत आहे. या फोटोमध्ये त्याच्या नाकातून रक्त वाहताना दिसत आहे. हा फोटो तेव्हाचा आहे जेव्हा गुरु काश्मीरमध्ये त्याच्या सिनेमाचं चित्रीकरण करत होता. काश्मीरमधली थंडी सहन न झाल्यामुळे त्याच्या नाकातून रक्त वाहायला लागलं. गुरु रंधावा काश्मीरमध्ये वजा तापमानात चित्रीकरण करत होता. नाकातून रक्त वाहतानाचा फोटो शेअर करताना लिहिले की, 'उणे ९ अंश सेल्सिअसमध्ये चित्रीकरण करणं खूप कठीण आहे. पण कठोर परिश्रम करणं हाच पुढे जाण्याचा एकमेव मार्ग आहे. आम्ही काश्मीरमध्ये चांगलं शूट केलं. लवकरच टी- सीरिजवर येत आहोत. ' गुरु रंधावा याने हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर त्याचे चाहते फारच अस्वस्थ झाले होते. चाहत्यांनी रडणारे इमोजी पोस्ट करून आपल्या मनातील भावना व्यक्त करायला सुरुवात केली. तो बरा आहे की नाही असे प्रश्न चाहते विचारू लागले. यासोबतच त्याच्या उत्तम प्रकृतीची प्रार्थनाही देवाकडे करू लागले. एका चाहत्याने लिहिले की, 'आपण खूप मेहनती आहात' तर दुसर्या चाहत्याने लिहिले की, 'परिश्रमाचा फळ मिळतच. तुमचं काम सुपरहिट होईल. ऑल द बेस्ट. ' काही दिवसांपूर्वी गुरु रंधावाने काश्मीरचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. यात त्याच्यासोबत अभिनेत्री मृणाल ठाकूर दिसली होती. काश्मीरच्या गुलमर्ग येथे गुरुने 'अभी ना छोड़ो मुझे' या म्युझिक व्हिडिओचं चित्रीकरण केलं आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Maef7z