'लक्ष्मी', 'दुर्गामती', 'भारत', 'लाल सिंग चड्ढा' ही गेल्या काही वर्षांतली बॉलिवूडमधली रिमेकची उदाहरणं. पण आता या रिमेकच्या ट्रेंडमध्ये छोटा पडदाही मागे नाही. आता केवळ चित्रपटांमध्येच नाही तर प्रादेशिक भाषांमधल्या मालिकांचा हिंदी रिमेकही बघायला मिळतोय. या रिमेक केलेल्या मालिकांचा सध्या बोलबाला असून प्रेक्षकांच्या त्या चांगल्याच पसंतीस उतरत आहेत. रिमेकवर रिमेकरिमेकच्या या ट्रेंडमध्ये बाजी मारली ती बंगामी मालिकांनी. सध्या एका वाहिनीवर सुरू असलेल्या पाच मालिका बंगाली मालिकांवरून घेतल्या आहेत. यामध्ये 'अनुपमा', 'इमली', 'गुम है किसी के प्यार में', 'शौर्य और अनोखी की कहानी', 'साथ निभाना साथिया २' या मालिकांचा समावेश आहे. यापूर्वीही या वाहिनीवर बंगाली मालिकांचे हिंदी रिमेक झाले आहेत. आगामी 'पांड्या स्टोअर' ही मालिका बंगाली मालिकेचा रिमेक असणार आहे. तर 'गुप्ता ब्रदर्स' ही मालिका तेलुगु मालिकेवरून घेतली आहे. तर 'सतरंगी ससुराल' आणि 'पवित्र रिश्ता' या मालिकाही अनुक्रमे मराठी आणि बंगाली मालिकांच्या रिमेक होत्या. मिळतेय प्रेक्षकपसंतीहिंदी मालिकांमध्ये रिमेकची चलती आहे कारण त्या मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. सध्या रिमेक असलेल्या 'अनुपमा', 'इमली' आणि 'गुम है किसी के प्यार में' या मालिका रेटिंग्समध्ये सर्वात पुढे आहेत. याआधी 'पवित्र रिश्ता, 'सौभाग्यवती भवः' या रिमेक असलेल्या मालिकांचे टीआरपी सर्वाधिक असायचे. या मालिकांमुळे अनेक नवोदित कलाकारांना प्रसिद्धी मिळाली होती. एकेकाळी चित्रपटांचं चित्रीकरण स्वीत्झर्लंडमध्ये व्हायचं. त्यातल्या व्यक्तिरेखाही ग्लॅमरस असायच्या. पण आता लहान शहारात वास्तवदर्शी सिनेमे चित्रित केले जातात. प्रेक्षकांचा दृष्टिकोन बदलला आहे. वास्तववादी गोष्टी ते बघू इच्छितात. प्रादेशिक मालिकांमध्ये आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर आधारित गोष्टी असतात. याच कारणामुळे बघणारा प्रेक्षकवर्गही त्याकडे खेचला जातो. घराघरात असणारे नातेसंबंध अशा मालिकांमध्ये दिसले की मध्यमवर्गीयांना ते त्यांच्या जवळचं वाटू लागतं. - राजन शाही, निर्माते हिंदी मालिका - मूळ प्रादेशिक मालिका अनुपमा - श्रीमोई (बंगाली) इमली- इस्टी कुटुम (बंगाली) शौर्य और अनोखी की कहानी - मोहोर (बंगाली) गुम है किसी के प्यार में- कुसुम डोला (बंगाली) साथ निभाना साथिया २- के आपोन पोर (बंगाली) पांड्या स्टोर - पंड्यन स्टोर (तमिळ) गुप्ता ब्रदर्स - के वादिनम्मा (तेलुगु) कार्तिक पूर्णिमा - रंग माझा वेगळा (मराठी) सतरंगी ससुराल - होणार सून मी ह्या घरची (मराठी) पवित्र रिश्ता- थिरुमथी सेल्वम (तमिळ)
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2XQbF8V