Full Width(True/False)

वारंवार येणाऱ्या स्पॅम कॉल्सला वैतागला? ‘या’ ५ अ‍ॅप्सच्या मदतीने नंबर्स करा ब्लॉक

नवी दिल्ली : कोणतेही काम करत असताना अचानक आल्यावर मोठी समस्या निर्माण होते. तुम्हाला देखील वारंवार स्पॅम कॉल्स येत असतील, तुम्ही ते कंट्रोल करू शकता. यासाठी तुम्ही कॉल ब्लॉकिंग अ‍ॅप्सची मदत घेऊ शकता. वर तुम्हाला असे अनेक अ‍ॅप्स मिळतील. आम्ही तुम्हाला अशाच काही अ‍ॅप्सची माहिती देत आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही स्पॅम कॉल कंट्रोल करू शकता व अन्य कॉल देखील ब्लॉक करा येतील. नंबर देखील याद्वारे ब्लॉक करता येईल. तसेच, काही अ‍ॅप्समध्ये एसएमएसशी संबंधित सुविधा देखील मिळते. वाचा: Android यूजर्ससाठी सर्वात चांगल्या कॉल ब्लॉकिंग अ‍ॅपपैकी एक आहे. हे अ‍ॅप चांगल्या यूआयसोबत येते व यूजर्सला सर्व सुविधा पुरवते. या अ‍ॅपद्वारे अनोळखी कॉल्स ओळखता येतात. सोबतच, स्पॅम कॉल आणि एसएमएसपासून देखील सुरक्षित ठेवते. हे फसवणूक, टेलिकार्केटिंग आणि अन्य इनकमिंग कॉल्स/मेसेजची ओळख पटवते. अशा नंबर्सला तुम्ही ब्लॉक देखील करू शकता. याप्रकारे तुम्ही ज्या नंबर्सला ब्लॉक करायचे आहे त्याची यादी कंप्लायड करू शकता. Hiya देखील लोकप्रिय अ‍ॅपपैकी एक आहे. यामध्ये जाहिराती नसतात ही चांगली गोष्ट आहे. याचे यूआय चांगले आहे व अनेक फीचर्स मिळतात. हे कॉल ब्लॉकिंग अ‍ॅपप्रमाणे इनकमिंग कॉलची ओळख पटवते. तसेच, स्मार्ट डायलरमध्ये नंबर ठेवू शकता. स्पॅम नंबरला मॅन्यूल ब्लॉक आणि रिपोर्ट करता येईल. तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्ट्समधील नाव आणि पत्ता याच्याशी जोडू शकता. हे अ‍ॅप रोबोकॉल, मार्केटर्स, डेट कलेक्टर्स आणि फ्रॉड कॉल्स ओळखते. कॉल्स ब्लॅकलिस्ट एक चांगले कॉल ब्लॉकिंग अ‍ॅप आहे. या अ‍ॅपमध्ये नंबर ब्लॉक करणे सोपे आहे. तसेच, हे कॉलसह एसएमएस देखील ब्लॉक करू शकते. तसेच, टेलिमार्केटिंग, स्पॅम आणि रोबोकॉलला ब्लॉक करण्यास सक्षम आहे. तसेच, असे कॉल्स तुम्ही स्वतः देखील ब्लॉक करू शकता. कॉल ब्लॉकिंगसाठी तुम्ही Call Blocker by Fiorenza Francesco अ‍ॅपचा देखील वापर करू शकता. या अ‍ॅपचे यूआय शानदार असून, यात अनेक फीचर्स उपलब्ध आहे. हे अ‍ॅप्लिकेशन कॉल सेंटर, स्पॅम नंबर, रोबोकॉल, टेलिमार्केटिंगसह अनोळखी कॉल्सला ब्लॉक करते. तुम्ही अ‍ॅपवरून कोणत्याही नंबर ब्लॉक करू शकता. तसेच, ठराविक कालावधीसाठी कॉल ब्लॉकिंगची सुविधा देखील मिळेल. Should I Answer? कॉल ब्लॉकिंगसाठी Should I Answer? हे एक चांगले अ‍ॅप आहे. या अ‍ॅपमध्ये तुम्हाला कॉल ब्लॉकिंगसंदर्भातील सर्व सुविधा मिळतील. अ‍ॅपमध्ये स्पॅम नंबर्सचा एका मोठा डेटाबेस असून, हा डेटाबेस अपडेट होत जातो. स्पॅम नंबर्सपैकी कोणी कॉल करत असेल तर हे आपोआप त्या नंबरला ब्लॉक करते. अ‍ॅप हिडन, फॉरेन आणि प्रीमियम रेट नंबर्सला ब्लॉक करते. तुम्ही देखील यामध्ये इतर नंबर्स समाविष्ट करू शकता. विशेष म्हणजे अ‍ॅप वापरण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता नाही. फोन इंटरनेटशी कनेक्ट असताना अ‍ॅप स्थानिक डेटाबेस अपडेट करेल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lAay94