Full Width(True/False)

एकाच दिवसात iPhone 13 सीरीजची बुकिंग ४० लाखपार, चीनमध्ये जबरदस्त क्रेझ

नवी दिल्लीः अॅपल (Apple) ने १४ सप्टेंबर रोजी आपली iPhone 13 सीरीज लाँच केली आहे. आयफोनची ही लेटेस्ट जनरेशन जगातील अनेक मार्केट्समध्ये आधीपासून प्री बुकिंगसाठी उपलब्ध आहे. चीनमध्ये फक्त एका दिवसात आयफोन १३ सीरीजची बुकिंग ४० लाख युनिट्स पार झाली आहे. कंपनीने iPhone 13 सीरीज अंतर्गत iPhone 13, iPhone 13 Mini, iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max लाँच केली आहे. चीनमध्ये आयफोन १३ सीरीजला जबरदस्त प्रतिसाद सध्या पॉप्यूलर चायनीज ई-रिटेलर JD.com वर बुकिंगसाठी iPhone 13 सीरीजचे बेस मॉडल्स आणि प्रो व्हेरियंट्स लिस्टेड आहे. १५ सप्टेंबर रोजी बुकिंगला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या काही तासात काही मॉडल्सचा आकडा ५००,००० युनिट्स पार झाला आहे. काही तासात ही आकडेवारी दुप्पट झाली आहे. एका दिवसात बुकिंगची फायनल आकडेवारी याच्यापेक्षा जास्त असू शकते. कारण, आधीच्या तुलनेत बुकिंगसाठी थोडा वेळ लागतो. आयफोन १३ सीरीजची बुकिंग ४० लाख युनिट्स पार लिस्टिंगच्या हिशोबानुसार, गिज्मोचाइना च्या रिपोर्टमध्ये म्हटले की, 2021 iPhone च्या प्रत्येक मॉडलची बुकिंग १० लाख युनिट्स पार करण्यात आली आहे. रिपोर्टमध्ये म्हटले की, iPhone 13, iPhone 13 mini, iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max साठी सीरीजची एकूण प्री बुकिंग ४० लाख युनिट्स हून जास्त असू शकते. प्री बुकिंगची ही आकडेवारी पूर्णपणे योग्य आहे. त्यामुळे हे कन्फर्म करण्यात आले नाही की, आयफोन १३ सीरीजवरून चीनमध्ये जबरदस्त क्रेझ आहे. याशिवाय, नवीन 2021 iPad सुद्धा बुकिंगसाठी लिस्टेड आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3EqiUIE