Full Width(True/False)

फीचर फोनच्या किंमतीत खरेदी करा स्मार्टफोन, फोनची किंमत ३,९८४ रुपयांपासून सुरू

तुमचे बजेट खूपच कमी आहे व नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काळजी करण्याचे कारण नाही. आम्ही तुम्हाला अशाच काही स्मार्टफोन्सची माहिती देणार आहोत, ज्यांची किंमत खूपच कमी आहे. फीचर फोनमधून स्मार्टफोनमध्ये येणाऱ्या ग्राहकांसाठी हे फोन्स सर्वोत्तम पर्याय ठरतील. कमी बजेटमध्ये तुम्हाला Samsung M01 Core, Itel A25 Pro, itel A23 Pro, Lava Z1, Lava Z61 Pro, Coolpad Mega 5M आणि Micromax Spark Go सारखे स्मार्टफोन्स ई-कॉमर्स वेबसाइट अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून सहज मिळतील. विशेष म्हणजे या स्मार्टफोन्सची किंमत जवळपास ६ हजार रुपये आहे. त्यामुळे फीचर फोन्सच्या किंमतीत तुम्हाला शानदार फीचर्ससह येणारे स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी आहे. या बजेट फोनमध्ये तुम्हाला शानदार डिस्प्ले आणि पॉवरफुल कॅमेरा मिळेल. या फोन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Samsung M01 Core
Samsung M01 Core

सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये ५.३० इंचाचा डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन ७२०x१४८० पिक्सल आहे. यात MediaTek MT६७३९ क्वाड कोर प्रोसेसरसह १ जीबी रॅम आणि १६ जीबी स्टोरेज दिले आहे. कॅमेरा सेटअपबद्दल सांगायचे तर फोनमध्ये रियरला ८ मेगापिक्सल कॅमेरा आणि फ्रंटला ५ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये पॉवरसाठी ३००० एमएएचची बॅटरी दिली आहे. Flipkart वर हा फोन फक्त ४,९९९ रुपयात मिळत आहे.

Itel A25 Pro
Itel A25 Pro

Itel A25 Pro स्मार्टफोनमध्ये ५.० इंचाचा डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन ७२०x१२८० पिक्सल आहे. यात १.४GHz क्वाड कोर प्रोसेसरसह १ जीबी रॅम आणि १६ जीबी स्टोरेज दिले आहे. फोनमध्ये रियरला ५ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. तर फ्रंटला २ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. पॉवरसाठी ३०२० एमएएचची बॅटरी दिला आहे. हा फोन अँड्राइड Pie (Go Edition) वर काम करतो. Flipkart वर हा फोन फक्त ४,९९९ रुपयात उपलब्ध आहे.

itel A23 Pro
itel A23 Pro

आयटेलच्या या फोनमध्ये ५.० इंचाचा डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन ४८०x८५४ पिक्सल आहे. यात क्वाडकोर १.४ GHz प्रोसेसर दिला आहे. हा फोन अँड्राइड १० गो एडिशनवर काम करतो. यात १ जीबी रॅम आणि ८ जीबी इंटर्नल स्टोरेज दिले आहे. फोनमध्ये रियरला २ मेगापिक्सल आणि सेल्फीसाठी फ्रंटला ०.३ मेगापिक्सल कॅमेरा मिळेल. २४०० एमएएच बॅटरीसह येणाऱ्या itel A23 Pro फोनची किंमत ३,९८४ रुपये आहे.

Lava Z1
Lava Z1

Lava Z1 मध्ये ५.० इंचाचा डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन ४८०x८५४ पिक्सल आहे. यात क्वाड कोर MediaTek Helio A20 प्रोसेसर आणि अँड्राइड १० गो एडिशन दिले आहे. फोनमध्ये २ जीबी रॅम व १६ जीबी इंटर्नल स्टोरेज दिले आहे. यात रियरला ५ मेगापिक्सल आणि फ्रंटला ५ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा मिळतो. पॉवरसाठी यात ३१०० एमएएचची बॅटरी दिली आहे. फोनला फ्लिपकार्टवरून ५,१९९ रुपयात खरेदी करू शकता.

Lava Z61 Pro
Lava Z61 Pro

या फोनमध्ये ५४५ इंचाचा डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन ७२०x१४४० पिक्सल आहे. फोन अँड्राइड १० वर काम करतो. यात १.८ GHz ऑक्टा कोर प्रोसेसरसह २ जीबी रॅम आणि १६ जीबी इंटर्नल स्टोरेज दिले आहे. फोनमध्ये रियरला ८ मेगापिक्सल आमि फ्रंटला ५ मेगापिक्सल कॅमेरा दिला आहे. यात पॉवरसाठी ३१०० एमएएचची बॅटरी मिळते. Lava Z61 Pro स्मार्टफोन फक्त ५,७७७ रुपयात उपलब्ध आहे.

Coolpad Mega 5M
Coolpad Mega 5M

Coolpad च्या या स्मार्टफोनमध्ये ५.० इंच डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १२८०x७२० पिक्सल आहे. यात क्वाडकोर SC9850K प्रोसेसरसह १ जीबी रॅम आणि १६ जीबी स्टोरेज दिले आहे. फोन अँड्राइड ८.१ वर काम करतो. यात रियरला ५ मेगापिक्सल आणि फ्रंटला २ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा दिला आहे. यामध्ये २००० एमएएचची बॅटरी दिली आहे. Coolpad Mega 5M स्मार्टफोनला तुम्ही फ्लिपकार्टवरून फक्त ४,२९९ रुपयात खरेदी करू शकता.

Micromax Spark Go
Micromax Spark Go

या स्मार्टफोनमध्ये ५.० इंचाचा डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन ४८०x८५४ पिक्सल आहे. यात क्वाड कोर Spreadtrum SC9832E प्रोसेसर आणि अँड्राइड ८.१ Oreo (Go edition) दिले आहे. फोनमध्ये १ जीबी रॅम आणि ८ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळते. यात रियरला ५ मेगापिक्सल आणि फ्रंटला २ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. पॉवरसाठी २००० एमएएचची बॅटरी दिली आहे. Micromax Spark Go स्मार्टफोन ४,९९९ रुपयात उपलब्ध आहे.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3u325yX