Full Width(True/False)

सोनू सुदच्या अडचणीत वाढ, २० कोटीचा कर चुकवल्याचा आरोप

मुंबई : करोना काळात गरजू लोकांना मदत केल्यामुळे त्यांच्यासाठी आणि इतर अनेकजणांसाठी मसीहा झाला. परंतु गरीबांचा मसीहा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनूने २० कोटी रुपयांचा कर चुकवला असल्याची बातमी समोर आली आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या तीन दिवसांपासून अभिनेत्याच्या घराची तसेच कार्यालयांची पाहणी केली. सोनूसह त्याच्या सहकाऱ्यांच्याही घराची तपासणी केली. त्यातून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कर चोरी केल्यासंदर्भातील काही महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. आयकर विभागाने प्रसिद्ध केलेल्या एका पत्रकामध्ये नमूद केले की, सोनू सुद आणि त्याच्या काही सहकाऱ्यांनी २० कोटी रुपयांहून अधिक रक्कमेचा कर चुकवला आहे. तसेच सोनूच्या चॅरीट संस्थेला २.१ कोटी रुपयांची आर्थिक मदत परदेशातून झाली होती. परंतु ही मदत गैरमार्गाने करण्यात आली होती. या व्यवहारामुळे परदेशी देणगी नियमन कायद्याचे (FCRA) उल्लंघन झाले आहे. तसेच जमा झालेला पैसा हा एका क्राऊड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवरून जमा करण्यात आला होता. आयकर विभागाने पुढे सांगितले आहे की, सोनूने खोटेपणा करून आणि कर्जाच्या रुपात बेहिशोबी पैसा जमा केला आहे. इतकेच नाही तर सोनूने २०२० मध्ये त्याची स्वतःची सामाजिक संस्था सुरू केली. त्याच्या या संस्थेला १ एप्रिल २०२१ पासून आतापर्यंत १८.९४ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. या देणग्यांच्या रक्कमेतील १.९ कोटी रुपये वेगवेगळ्या कामासाठी खर्च झाले आहेत. तर शिल्लक राहिलेले १७ कोटी रुपये अद्याप खात्यामध्ये आहेत. आयकर विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकामध्ये असेही नमूद केले की, सोनूशी संबंधित असलेल्या ज्या ज्या ठिकाणी विभागाने तपासणी केली त्या ठिकाणांमध्ये मुंबई, लखनऊ, जयपूर, कानपूर, दिल्ली आणि गुरूग्रामसह २८ ठिकाणांचा समावेश आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी सोनू सुदने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. त्यावेळी सोनूला दिल्ली सरकारने त्यांच्या मेंटॉर प्रोग्रॅमचा ब्रँड अँबेसिडर बनवण्यात येत असल्याचे केजरीवाल यांनी जाहीर केले होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3EtneXK