Full Width(True/False)

भारतात एंट्री करणार Xiaomi चा ‘हा’ जबरदस्त स्मार्टफोन, लाँचआधी किंमत-फीचर्स लीक

नवी दिल्ली : ने काही दिवसांपूर्वीच जागतिक बाजारात स्मार्टफोनला लाँच केले आहे. फोनची किंमत ३६९ यूरो आहे. हा फोन ९० हर्ट्ज रिफ्रेश रेट डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन ७७८जी प्रोसेसरसह येतो. हा हँडसेट २९ सप्टेंबरला भारतीय बाजारात लाँच होणार आहे. मात्र, लाँचिंगच्या आधीच फोनची किंमत आणि व्हेरिएंट्सचा खुलासा झाला आहे. वाचा: टिप्स्टर देबायन रॉयने Mi 11 Lite 5G NE च्या किंमत आणि व्हेरिएंट्सची माहिती शेअर केली आहे. फोनला ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज, ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम व २५६ जीबी स्टोरेजमध्ये लाँच केले जाईल. ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजची किंमत २१,९९९ रुपये असेल. ही किंमत खरी असल्यास फोनची ग्लोबल व्हेरिएंटच्या तुलनेत भारतात कमी किंमती विक्री केली जाईल. याशिवाय, टिप्स्टरने खुलासा केला आहे की, हा फोन ट्रफल ब्लॅक, पीच पिंक, बबलगम ब्लू आणि स्नोफ्लेक व्हाइट अशा चार रंगात येईल. मात्र, स्नोफ्लॅक व्हाइट व्हेरिएंटला त्वरित उपलब्ध केले जाणार नाही. भारतात हे कलर्स वेगळ्या नावाने सादर केले जाऊ शकतात. Xiaomi Mi 11 Lite 5G NE: स्पेसिफिकेशन्स Mi 11 Lite 5G NE स्मार्टफोनमध्ये ६.५५ इंच फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे, जो फुल एचडी+ रिझॉल्यूशनसह येतो. यात ९० हर्ट्ज स्क्रीन रिफ्रेश रेटसह येणारा एमोलेड पॅनेल दिला आहे, जो एचडीआर10+ सपोर्ट करतो. फोनमध्ये २० मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात ६४ मेगापिक्सल प्रायमरी, ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड आणि ५ मेगापिक्सल टेलिमॅक्रो सेंसर मिळते. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७७८जी चिपसेटसह ८ जीबी रॅम व २५६ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिले आहे. पॉवरसाठी ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४२५०एमएएचची बॅटरी मिळेल. स्मार्टफोनमध्ये बाजूला फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे. हा फोन अँड्राइड ११ ओएस आधारित MIUI १२.५ वर काम करतो. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kjdC9W