Full Width(True/False)

१०० हून जास्त डेटा आणि फ्री कॉलिंग, ७० दिवसांपर्यंतचा सर्वात मस्त प्लान

नवी दिल्लीः टेलिकॉम कंपन्या युजर्संना आकर्षित करण्यासाठी अनेक जबरदस्त प्लान ऑफर करीत आहे. युजर्संना डेली १.५ जीबी डेटा ऑफर करणारे अनेक प्लान आहेत. या युजर्ससाठी कंपन्यांकडे अनेक असे प्रीपेड प्लान आहेत. जे ५०० रुपयांपेक्षा कमी आहे. या प्लानमध्ये रोज १.५ जीबी डेटा आणि ७० दिवसाची वैधता ऑफर करीत आहे. डेटा आणि ७० दिवसाची वैधता ऑफर करीत आहे. जाणून घ्या रिलायन्स जिओ (), एयरटेल, बीएसएनएल आणि Vi वोडाफोन आयडियाच्या काही बेस्ट प्लान्स संबंधी जो ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत रोज १.५ जीबी शिवाय आणि जबरदस्त बेनिफिट ऑफर करीत आहे. ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत एअरटेलचा १.५ जीबी डेटाचा प्लान एअरटेल ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत डेली १.५ जीबी डेटाचे तीन बेस्ट प्लान ऑफर करीत आहे. हे प्लान २४९ रुपये, २८९ रुपये, आणि ३९९ रुपयांचे आहेत. २८९ रुपये आणि २४९ रुपयाचे प्लान २८ दिवसाच्या वैधतेसोबत येतात. तर ३९९ रुपयाचा प्लान तुम्हाला ५६ दिवसाच्या वैधतेसोबत मिळतो. या तिन्ही प्लानमध्ये रोज १०० फ्री एसएमएस आणि देशात कोणत्याही नेटवर्कवर ट्रूली अनलिमिटेड कॉलिंग दिली जाते. प्लान्समध्ये मिळणारे अतिरिक्त बेनिफिट्मध्ये ३० दिवसाचे अॅमेझॉन प्राइम व्हिडिओचे मोबाइल एडिशनचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत १.५ जीबीचे जिओचे बेस्ट प्लान जिओकडे डेली १.५ जीबी डेटा ऑफर करणारे तीन प्लान आहेत. कंपनी आपल्या ९८ रुपयाच्या प्लानमध्ये १४ दिवसाची वैधता सोबत रोज १.५ जीबी डेटा देत आहे. कंपनीचा १९९ रुपयाचा प्लान २८ दिवसाची वैधता आणि ३९९ रुपयाचा प्लान ५६ दिवसाच्या वैधते सोबत येतो. रोज १.५ जीबी डेटा ऑफर करणाऱ्या या प्लानमध्ये अनलिमिटेड फ्री व्हाइस कॉलिंगची सुविधा दिली जाते. १९९ रुपये आणि ३९९ रुपयाच्या प्लानमध्ये कंपनी रोज १०० फ्री एसएमएस ऑफर करीत आहे. तर ९८ रुपयाच्या प्लानमध्ये फ्री एसएमएस बेनिफिट दिले जात नाही. या तिन्ही प्लानच्या सब्सक्राइबर्सला कंपनी जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन देत आहे. Vi चे सर्वात मस्त १.५ जीबी डेटाचे प्लान ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे काही बेस्ट प्लान ऑफर करीत आहे. या प्लानमध्ये ७० दिवसांपर्यंत वैधता मिळते. तसेच डेली १.५ जीबी डेटा दिला जातो. वोडाफोन आयडियाचे २४९ रुपयाच्या प्लानमध्ये तुम्हाला २८ दिवसासाठी रोज १.५ जीबी डेटा मिळतो. तर ३९९ रुपयाच्या प्लानमध्ये कंपनी ५६ दिवसाच्या वैधतेसोबत डेली १.५ जीबी डेटा ऑफर करीत आहे. जर वोडाफोनच्या ४९९ रुपयाच्या प्लानला रिचार्ज केले तर तुम्हाला ७० दिवसाची वैधते सोबत रोज १.५ जीबी डेटा मिळेल. सर्व प्लानमध्ये कंपनी कोणत्याही नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री एसएमएस देत आहे. या प्लान्समध्ये यात बिंज ऑल नाइट आणि विकेंड डेटा रोलओवरचे बेनिफिट दिले जात आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3AiiZvx