मुंबई: बॉलिवूडचा बादशाह स्वतःला स्टायलिश व परिपूर्ण दिसण्यासाठी कोणतीही किमत मोजायला तयार असतो. नुकत्याच आपल्या एका व्हिडिओसाठी केलेल्या खास लूकसाठी त्याने जवळपास 35 लाख रुपये खर्च केले होते. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख आपल्या दमदार अभिनय व रोमॅंटिक अदेसाठी चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूड अर्थात हिंदी चित्रपटसृष्टित शाहरुखची जादू कायम आहे. त्याचे चाहते त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या खास स्टाईलचे देखील दीवाने आहेत. आणि अनेक जण त्या खास शैलीची नक्कल करतानाही दिसून येतात. शाहरुखने ओटीटी ‘डेब्यू’ची केली होती घोषणाकाही काळ अगोदरच शाहरुख खानने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत, जाहीर केले होते की, तो लवकरच ओटीटी प्लेटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. त्याचा हा व्हिडिओ पाहून त्याच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला होता. मात्र आज आपण त्यांच्या या व्हिडिओबद्दल नव्हे तर त्यामध्ये दिसलेल्या शाहरुखच्या खास लूकबद्दल बोलणार आहोत. व्हिडिओत शाहरुखचा ‘सुपर एक्स्पेन्सिव्ह लूक’शाहरुखने प्रसिद्ध केलेल्या या व्हिडिओमध्ये त्याने डेनिम जॅकेट, सफेद टी शर्ट व कार्गो पॅंटसोबतच स्निकर्स घातल्याचे दिसून आले होते. त्यासोबतच त्याने आपल्या लूकला परिपूर्ण करण्यासाठी एक स्टायलिश घड्याळ देखील घातल्याचे दिसून आले होते. या पेहरावात शाहरुख खूपच कूल व हॅंडसम दिसत होता. मात्र तुम्हाला हे माहित आहे की, शाहरुखचा हा लूक किती महागडा आहे. होय शाहरुखने या व्हिडिओसाठी साधारण ३५ लाख रुपये खर्च करुन स्वतःसाठी खास लूक तयार केला होता. सोशल मीडियावर शेअर झाली माहिती या व्हिडिओमध्ये शाहरुख खानच्या या खास लूकबद्दल आणि त्यासाठी केलेला खर्च व त्याच्या ब्रॅंडबद्दल एका इन्स्टाफॅन पेजवर माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये सांगितले आहे की, व्हिडिओत दिसलेल्या खास लूकमध्ये शाहरुखने परिधान केलेला डेनिम जैकेट हा ‘AMIRI’ ब्रॅंडचा होता, त्याची किंमत १२३९ डॉलर्स होती. अर्थात भारतीय चलनात त्याची किंमत सुमारे ९१ हजार ३०७ रुपए होते. तर शाहरुखचा साधारण सफेद टी-शर्ट ‘Zadig&Voltaire’ ब्रॅंडचा आहे, ज्याची किंमत १४९ डॉलर म्हणजेच ११ हजार ६८३ रुपये आहे. बुट व घड्याळाची ‘ही’ आहे किंमतयाशिवाय शाहरुखच्या बुटांची किंमत 495 डॉलर असून ते ‘Nike Air Jordan’ ब्रॅंडचे दिसत आहेत. या बुटांची भारतीय चलनातील किंमत सुमारे 36 हजार 374 रुपए होते. मात्र या सर्वांमध्ये जी वस्तू सर्वात महागडी होती, ती म्हणजे शाहरुखने हातात घातलेले घड्याळ. अतिशय सुंदर दिसणारे हे घड्याळ ‘Patek Philippe’ ब्रॅंडचे होते, ज्याची किंमत 43 हजार 770 डॉलर म्हणजेच भारतीय चलनात त्याची किंमत सुमारे 32 लाख 25 हजार 520 रुपये आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/39GIdrQ