Full Width(True/False)

तुमच्या रिचार्जपेक्षाही कमी किंमतीत येतात 'हे' फोन्स, सुरुवाती किंमत फक्त ६६९ रुपये

नवी दिल्ली : भारतीय मोबाइल बाजारात अनेक स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत, जे वेगवेगळ्या फीचर्स आणि प्राइस सेगमेंटमध्ये येतात. स्वस्त स्मार्टफोनसाठी यूजर्सला जवळपास ६ हजार रुपये खर्च करावे लागतात. मात्र, भारतीय बाजारात काही फीचर फोन्स असे आहेत, ज्यांची किंमत खूपच कमी आहे. या फोन्सच्या किंमतीपेक्षा अधिक किंमत सहा महिन्यांच्या रिचार्ज प्लान्सची आहे. हे तुम्हाला आणि वर मिळतील. वाचा: सॅमसंगच्या या फोनमध्ये १.५ इंच डिस्प्ले दिला आहे. या फोनची किंमत १,३१० रुपये आहे. सॅमसंगचा हा फोन कॉम्पॅक्ट डिझाइनसह येतो. यात ८०० एमएएची बॅटरी दिली आहे. फोन चार रंगात येतो. यात एमपी ३ रिंगटोन आणि इन बिल्ट फ्लॅश लाइट दिले आहे. फोनमध्ये एक सिमचा सपोर्ट मिळेल. लावाच्या या फोनला फ्लिपकार्टवरून १,२४२ रुपयात खरेदी करू शकता. यात अनेक शानदार फीचर्स मिळतात. फोनमध्ये १.८ इंच क्यूवीजीए डिस्प्ले दिला आहे. यात ३२ एमबी रॅम आणि २४ एमबी स्टोरेज मिळते. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डने ३२ जीबीपर्यंत वाढवू शकता. फोनमध्ये १७५० एमएएचची बॅटरी आणि बॅक पॅनेलवर ०.३ मेगापिक्सल कॅमेरा दिला आहे. Nolia 105 DS 2020 फीचर फोन फ्लिपकार्टवर १,३४९ रुपयात उपलब्ध आहे. फोनमध्ये ४ एमबी रॅम आणि ४ एमबी स्टोरेज मिळते. यात १.८ इंच क्वार्टर क्यूवीजीए डिस्प्ले दिला आहे. पॉवरसाठी ८०० एमएएचची बॅटरी दिला आहे. मात्र, यात कॅमेरा मिळत नाही. फ्लिपकार्टवरून या फोनला तुम्ही फक्त ६६९ रुपयात खरेदी करू शकता. यात ३२ एमबी रॅम आणि ३२ एमबी स्टोरेज मिळते. फोनमध्ये १.८ इंच डिस्प्ले दिला आहे. तसेच, बॅक पॅनेलवर ०.३ मेगापिक्सल कॅमेरा आणि ८०० एमएएचची बॅटरी दिली आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3AhcV6F