Full Width(True/False)

स्मार्टफोन पासून लॅपटॉप पर्यंत, जबरदस्त गॅझेट्सवर ८० टक्क्यांपर्यंत बंपर सूट

नवी दिल्लीः जर तुम्हाला एक नवीन स्मार्टफोन किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक गॅझेट खरेदी करायचा असेल तर आता तुमच्याकडे जबरदस्त संधी आहे. ३ ऑक्टोबर पासून अमेझॉनवर सुरू होणाऱ्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल मध्ये टॉप कंपन्यांचे जबरदस्त स्मार्टफोन शिवाय, लॅपटॉप, स्मार्टवॉच, आणि स्मार्ट टीव्ही वर सुद्धा बंपर सूट सोबत खरेदी करू शकता. एका महिन्यांपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये जबरदस्त गॅझेट्सला ८० टक्क्यांपर्यंत सूट सोबत ऑर्डर केले जावू शकते. तसेच या सेलमध्ये कंपनी एक्सचेंज ऑफर आणि नो कॉस्ट ईएमआयचा ऑप्शन देणार आहे. बेस्ट डील मध्ये खरेदी करा विवो आणि सॅमसंगचे स्मार्टफोन अमेझॉनवर लाइव्ह झालेल्या लँडिंग पेज माहितीनुसार, या सेलमध्ये अॅपल शिवाय, सॅमसंग, विवो, वनप्लस, रेडमी आणि टेक्नो सोबत अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन डिस्काउंट किंमती सोबत लिस्ट होणार आहेत. सेलमध्ये तुम्ही सूट नंतर विवो V21e 5G ला २४ हजार ९९० रुपये, विवो V73 ला २० हजार ९९० रुपये आणि विवो X60 प्रो ला ४९ हजार ९९० रुपयात खरेदी करू शकता. याशिवाय, सेलमध्ये ५४ हजार ९९९ रुपये किंमतीचा सॅमसंग गॅलेक्सी नोट २० फोन ४४ हजार ९९९ रुपयात मिळेल. तर स्नॅपड्रॅगन ८६५ प्लस SoC ने लेस गॅलेक्सी नोट २० अल्ट्रा सेल मध्ये ६९ हजार ९९९ रुपयात मिळेल. बजेट सेगमेंटच्या स्मार्टफोन्सवरही बंपर ऑफर बजेट सेगमेंटमध्ये या सेलमध्ये टेक्नो स्पार्क ७ टी स्मार्टफोन १ हजार रुपयाच्या सूट सोबत खरेदी मिळेल. डिस्काउंटनंतर या फोनला तुम्ही ९ हजार ४९९ रुपयाऐवजी ८ हजार ४९९ रुपयात खरेदी करू शकाल. सेलमध्ये कंपनी स्पार्क ८, पॉप ५पी आणि टेक्नो पोवा २ काही बेस्ट डील्स सोबत ऑफर करणार आहे. रेडमी ९ ए सेलमध्ये ६ हजार ७९९ रुपयाच्या डिस्काउंट किंमतीसोबत खरेदी करू शकता. लॅपटॉप, स्मार्टवॉच आणि टीव्हीवर बंपर सूट अमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये लॅपटॉपवर ५० टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. हेडफोन्स आणि स्पीकरला तुम्ही या सेलमध्ये ८० टक्क्यांपर्यंत सूट सोबत खरेदी करू शकता. सेलमध्ये स्मार्टवॉचेज वर ६० टक्क्यांपर्यंत आणि टॅबलेट्सवर ४५ टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. याशिवाय, या सेलमध्ये तुम्ही टीव्ही आणि होम अप्लायन्सेजला ६५ टक्क्यांपर्यंत डिस्काउंट सोबत खरेदी करू शकता. अमेझॉन प्रमाणे फ्लिपकार्टवर सुद्धा ३ ऑक्टोबर पासून बिग बिलियन डे सेल सुरू होणार आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mpEpl1