Full Width(True/False)

वाढत्या महागाईत BSNL चे 'हे' ३ स्वस्त प्लान्स तुम्हाला निराश करणार नाही, डेटा-कॉलिंगसह बरंच काही

नवी दिल्ली : परवडणाऱ्या प्रीपेड प्लान्स उल्लेख करायचा झाल्यास त्यात पहिले नाव येईल. जर तुम्ही देखील परवडणारे रिचार्ज प्लान्स शोधत असाल तर आज आम्ही तुम्हाला BSNL च्या काही जबरदस्त प्लान्सची माहिती देत आहो. पाहा डिटेल्स. वाचा: BSNL ४९ रुपयांचा प्लान : बीएसएनएलच्या या प्लानमध्ये युझर्सना २ GB डेटा मिळतो. या प्लानमध्ये २४ दिवसांची वैधता देण्यात आली आहे, त्यासह सर्व नेटवर्कवर कॉल करण्यासाठी १०० मिनिटे आणि एकूण १०० मेसेजेस मिळतात. मोफत मिनिटांची मर्यादा पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला ४५ पैसे प्रति मिनिट शुल्क भरावे लागते. BSNL ९९ रुपयांचा प्लान युजर्सना या BSNL प्रीपेड प्लानमध्ये डेटा मिळत नाही, हा प्लान २२ दिवसांच्या वैधतेसह येतो . यासह, सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि एकूण १०० मेसेजेस दिले जातात. या प्लानमध्ये युजर्सना मोफत रिंगटोन देखील मिळतात. BSNL १४७ रुपयांचा प्लान : या बीएसएनएल रिचार्ज प्लानमध्ये, युजर्सना एकूण १० GB डेटा मिळतो. या प्लानमध्ये ३० दिवसांची वैधता उपलब्ध आहे. व्हॉईस कॉलिंगबद्दल बोलायचे झाले तर, या प्लानमध्ये, युजर्सना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग मिळते. यात युजर्सना मेसेजेस मिळत नाही. इतर फायद्यांविषयी सांगायचे तर, युजर्सना या प्लानमध्ये BSNL Tunes चे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. जर तुम्ही अशा प्लानच्या शोधात असाल ज्यात फक्त तुमचे सिम अॅक्टिव्ह असेल तर तुम्ही BSNL चे १९ रुपयांचे व्हॉइस कटर घेऊ शकता. BSNL च्या 19 रुपयांच्या या प्लानमध्ये ३० दिवसांची वैधता उपलब्ध आहे. हा प्लान घेतल्यावर, व्हॉईस कॉलिंगसाठी २० पैसे प्रति मिनिट द्यावे लागतात. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3tQyZCB