Full Width(True/False)

सॅमसंग आणतोय Galaxy A सीरीज आणखी एक स्वस्त स्मार्टफोन, मोठ्या बॅटरीसह मिळणार पॉवरफुल प्रोसेसर

नवी दिल्लीः सॅमसंगने गॅलेक्सी A03s स्मार्टफोनची घोषणा मागील महिन्यात केली होती. भारतात ११ हजार ४९९ रुपयाच्या किंमती सोबत केली होती. ताज्या माहितीनुसार, दक्षिण कोरियाची कंपनी Galaxy A03 नावाच्या फोनवर काम करीत आहे. हा फोन A03s चा लोअर व्हर्जन असू शकतो. नवीन हँडसेटला नुकतेच एफसीसी आणि गीकबेंज वर पाहिले गेले आहे. मॉडल नंबर SM-A032M चा एक सॅमसंग फोन यूएस मध्ये फेडरल कम्यूनिकेशन कमिशन (FCC) मध्ये दाखवले आहे. मॉडल नंबर SM-A032F सोबत याचे दुसरे व्हेरियंट गीकबेंज बेंजमार्किंग साइटवर दाखवले आहे. हे मॉडल नंबर सांगत आहे की, हा डिव्हाइस Samsung Galaxy A03 मॉनीकर सोबत बाजारात रिलीज होऊ शकतो. Samsung Galaxy A03 चे संभावित फीचर्स Galaxy A03 च्या FCC सर्टिफिकेशन वरून उघड झाले की, हा 5,000mAh च्या बॅटरी सोबत येवू शकतो. यावरून या डिव्हाइसवर 5G कनेक्टिविटीसाठी कोणताही सपोर्ट दिला नाही. A03 च्या गीकबेंच लिस्टिंग वरून उघड झाले की, Unisoc SC9863A द्वारा संचालित असेल. सॅमसंगचा हा स्मार्टफोन एक एन्ट्री लेवल फोन असेल. A03 च्या गीकबेंच वरून हेही उघड झाले की, यात 2 GB RAM आणि Android 11 OS आहे. गॅलेक्सी ए०२ ला ३ जीबी रॅम व्हेरियंट उपलब्ध करण्यात आले होते. त्यामुळे शक्यता आहे की, Galaxy A03 ३ जीबी रॅम पर्यायात येवू शकतो. ही सुद्धा शक्यता आहे की, नवीन फोन Galaxy A03s सारखे फीचर्स सोबत येईल. Galaxy A03s च्या फीचर्स मध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले, हीलियो पी ३५ चिपसेट, ४ जीबी रॅम, ६४ जीबी स्टोरेज आणि 5,000 एमएएचची बॅटरी दिली आहे. यासोबतच फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा, १३ मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा यूनिट आणि अँड्रॉयड ११ ओएस आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3megnsL