Full Width(True/False)

Oppo F19s चे स्पेसिफिकेशन्स लीक, ३ कॅमेरे आणि ६.६३ इंच डिस्प्लेसह स्मार्टफोन होऊ शकतो लाँच, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo आपला खास हँडसेट लाँच करण्याची तयारी करत आहे. दरम्यान, आगामी स्मार्टफोनशी संबंधित एक अहवाल समोर आला आहे, ज्यात त्याच्या मॉडेल क्रमांकासह काही स्पेसिफिकेशन माहिती देण्यात आली आहे. याआधीही Oppo F19s चे अनेक रिपोर्ट लीक झाले होते. वाचा: Gizmochina च्या अहवालानुसार, आगामी Oppo F19s स्मार्टफोनचा मॉडेल क्रमांक CPH2233 आहे. या स्मार्टफोनमध्ये ६.४३ -इंच पंच-होल AMOLED डिस्प्ले दिला जाईल. त्याचा आस्पेक्ट रेशो २० : ९ आहे. यात १६ MP सोनी IMX471 फ्रंट कॅमेरा मिळेल. तर मागील पॅनलमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला जाईल. यामध्ये पहिले ४८ MP मुख्य लेन्स आणि २ MP चे इतर दोन सेन्सर देण्यात आले आहेत. मिळू शकते ५००० mAh ची बॅटरी : पॉवर बॅकअपसाठी, OPPO F19s स्मार्टफोनमध्ये ५००० mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते, जी ३३ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. प्रोसेसर आणि ६ GB रॅम या स्मार्टफोनमध्ये मिळू शकते. या व्यतिरिक्त, फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ, ऑडिओ फोन जॅक आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे फीचर्स दिले जाऊ शकतात. Oppo F19s ची अपेक्षित किंमत : Oppo F19s स्मार्टफोनच्या लाँच , किंमत किंवा फीचर्सबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. परंतु, लीक झालेल्या अहवालांमध्ये दावा करण्यात आला आहे की या आगामी स्मार्टफोनची किंमत २०,००० ते २५,००० रुपयांच्या दरम्यान राहू शकते. Oppo F19 : Oppo ने एप्रिल मध्ये OPPO F19 स्मार्टफोन सादर केला. या स्मार्टफोनची किंमत २०,००० रुपयांपेक्षा कमी आहे. Oppo F19 स्मार्टफोनमध्ये ६.४३ -इंच फुल HD प्लस डिस्प्ले आहे. याचे रिझोल्यूशन १०८० x२,४०० पिक्सेल आहे. या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन ६६२ प्रोसेसर देण्यात आला आहे. या व्यतिरिक्त, डिव्हाइसला ५,००० mAh ची बॅटरी मिळेल, जी ३३ W फास्ट चार्जिंगसह सुसज्ज आहे. कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर OPPO F19 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात ४८ MP प्राथमिक सेन्सर, २MP डेप्थ सेन्सर आणि २MP मॅक्रो शूटर आहे. याशिवाय स्मार्टफोनच्या पुढील भागावर १६ एमपीचा सेल्फी कॅमेरा उपलब्ध असेल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3Emm2p5