नवी दिल्ली : ने भारतात आपला नवीन Moto Tab G20 ला लाँच केले आहे. या टॅबलेटची किंमत फक्त १०,९९९ रुपये आहे. या टॅबलेटला केवळ प्लॅटिनम ग्रे रंगात लाँच केले आहे. ग्राहक फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेलमध्ये डिव्हाइसला खरेदी करू शकतात. लाँच ऑफर अंतर्गत यावर १ हजार रुपये अतिरिक्त एक्सचेंज डिस्काउंट आणि बँक ऑफर्सचा फायदा मिळेल. वाचा: चे फीचर आणि स्पेसिफिकेशन टॅबमध्ये ८००x१२८० पिक्सल रिझॉल्यूशन ८ इंच IPS LCD पॅनेल दिला आहे. शानदार पिक्चर क्वालिटीसाठी डिस्प्लेमध्ये TDDI टेक्नोलॉजीचा वापर केला आहे. यात ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळते. टॅबमध्ये मीडियाटेक हीलियो पी२२टी चिपसेट मिळतो. फोटोग्राफीसाठी यात रियरला १३ मेगापिक्सल आणि फ्रंटला ५ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. टॅब अँड्राइड ११ ओएसवर काम करतो. पॉवरसाठी यात ५१०० एमएएचची बॅटरी दिली आहे. टॅबमध्ये दोन स्पीकरसह दमदार साउंडसाठी डॉल्बी एटमॉस ऑडिओ सपोर्ट दिला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी टॅबमध्ये वाय-फाय, ब्लूटूथ, एस यूएसबी पोर्ट आणि एक ३.५एमएम ऑडिओ जॅक दिला आहे. कंपनीचा हा टॅब स्लीक मेटल फिनिशसह येतो. यामुळे याचा लूक प्रीमियम दिसतो. या टॅबला जूनमध्ये इतर बाजारात लाँच झालेल्या लेनोवो टॅब एम८ (3rd Gen) चे रिब्रँडेड व्हर्जन म्हणून लाँच केले आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/39NoLKe