Full Width(True/False)

४८MP कॅमेरा आणि ५०००mAh बॅटरीसह येणाऱ्या Samsung Galaxy M32 5G चा पहिला सेल आज, मिळेल खास ऑफर

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वीच सॅमसंगने स्मार्टफोनला लाँच केले होते. या फोनमध्ये जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. यात ऑक्टा-कोर मीडियाटेक प्रोसेसर, क्वाड रियर कॅमेरा सेटअप आणि नॉच डिस्प्ले मिळेल. फोनची सुरुवाती किंमत १८,९९९ रुपये आहे. फोनचा पहिला सेल आजपासून ई-कॉमर्स वेबसाइट Amazon आयोजित करण्यात आला आहे. या फोनच्या किंमत आणि फीचर्सविषयी जाणून घेऊया. वाचा: ची किंमत आणि उपलब्धता: Samsung Galaxy M32 5G ला २०,९९९ रुपयात लाँच करण्यात आले होते. ही फोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत आहे. याच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत जाहीर करण्यात आलेली नाही. फोन स्लेट ब्लॅक आणि स्काय ब्लू रंगात येतो. यासोबत आयसीआयसीआय बँक ऑफर देत आहे. बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास २ हजार रुपये इंस्टंट डिस्काउंट मिळेल. डिस्काउंटनंतर फोनला १८,९९९ रुपयात खरेदी करू शकता. याशिवाय फोनवर ६ महिने फ्री स्क्रीन रिप्लेसमेंट आणि ९ महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआय ऑफर देखील मिळेल. Galaxy M32 5G चे फीचर्स: ड्यूल सिम सपोर्टसह येणारा हा फोन अँड्राइड ११ आधारित OneUI ३.१ वर काम करतो. यामध्ये ६.५ इंच एचडी+ टीएफटी इनफिनिटी वी डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेंसिटी ७२० प्रोसेसरसह येतो. यात ६ जीबी / ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मिळेल. स्टोरेजला १ टीबीपर्यंत वाढवू शकता. फोटोग्राफीसाठी यात क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याचा प्रायमरी सेंसर ४८ मेगापिक्सल आहे. दुसरा ८ मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल लेंस, तिसरा मॅक्रो आणि चौथा २ मेगापिक्सलचा डेप्थ शूटर आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये पॉवरसाठी ५००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे, जी १५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. कनेक्टिव्हिटीसाठी ५जी, वाय-फाय, ब्लूटूथ आणि जीपीएस सारखे फीचर्स मिळतील. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jCty71