Full Width(True/False)

नवीन फोन खरेदी करायचाय? ६४MP कॅमेऱ्यासह येणारे 'हे' ५ स्मार्टफोन नक्कीच आवडतील; पाहा किंमत

कमी किंमतीत शानदार कॅमेऱ्यासह येणारा फोन खरेदी करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. मात्र, चांगला कॅमेरा हवा असल्यास पैसे देखील जास्त खर्च करावे लागतात. काही बजेट फोनमध्ये देखील तुम्हाला शानदार कॅमेरा मिळतो. रेडमी, सॅमसंग, मोटोरोला सारख्या ब्रँड्सच्या फोनमध्ये तुम्हाला चांगला कॅमेरा मिळेल. विशेष म्हणजे या स्मार्टफोन्सची किंमत देखील कमी आहे. तुम्ही जर १५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत फोन शोधत असाल तर ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनवर तुम्हाला अनेक चांगले पर्याय मिळतील. १५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणाऱ्या फोन्सला भारतात सर्वाधिक मागणी आहे. कंपन्या देखील या प्राइस रेंजमध्ये चांगले फोन्स लाँच करत आहेत. या बजेटमध्ये तुम्हाला Redmi Note 10S, Tecno Camon 17, Samsung Galaxy M32, MOTOROLA G40 आणि POCO M3 सारखे स्मार्टफोन्स मिळतील.

Redmi Note 10S
Redmi Note 10S

Redmi Note 10S स्मार्टफोनची किंमत १४,९९९ रुपये आहे. या फोनमध्ये ६४ मेगापिक्सल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सोबतच, यात ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळते. फोनमध्ये ६.४३ इंचाचा डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १०८०x२४०० पिक्सल आहे. यात बॅक पॅनेलवर क्वाड कॅमेरा सेटअप दिला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा ६४ मेगापिक्सल, सेकेंडरी कॅमेरा ८ मेगापिक्सल, तिसरा २ मेगापिक्सल आणि पोर्ट्रेट लेंस आहे. फ्रंटला १३ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. यात ५००० एमएएचची बॅटरी दिली आहे.

Tecno Camon 17
Tecno Camon 17

Tecno Camon 17 ची किंमत १५ हजार रुपयांपेक्षा कमी आहे. या फोनला तुम्ही ई-कॉमर्स साइटवरून फक्त १३,९९९ रुपयात खरेदी करू शकता. यामध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळते. फोनच्या बॅक पॅनेलवर क्वाड कॅमेरा सेटअप आहे, यात ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. तर फ्रंटला सेल्फीसाठी १६ मेगापिक्सल कॅमेरा मिळेल. या फोनमध्ये ६.८ इंचाचा शानदार डिस्प्ले दिला असून, याचा टच सँपलिंग रेट १८० हर्ट्ज आहे. यात मीडियाटेक जी८५ गेमिंग प्रोसेसर सपोर्ट मिळतो.

Samsung Galaxy M32
Samsung Galaxy M32

Samsung Galaxy M32 स्मार्टफोनची किंमत १४,९९९ रुपये आहे. हा कंपनीचा लोकप्रिय बजेट फोनपैकी एक आहे. यामध्ये बॅक पॅनेलवर क्वाड कॅमेरा सेटअप दिला आहे, ज्याचा प्रायमरी कॅमेरा ६४ मेगापिक्सल आहे. यात ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळते. फोनमध्ये ६.४ इंचाचा सुपर एमोलेड डिस्प्ले दिला आहे. जो इनफिनिटी यू कट डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले फुल एचडी प्लस आहे. प्रोटेक्शनसाठी यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ दिला आहे. पॉवरसाठी ६००० एमएएचची बॅटरी मिळेल.

MOTOROLA G40 Fusion
MOTOROLA G40 Fusion

मोटोरोला G40 Fusion स्मार्टफोनला तुम्ही ई-कॉमर्स वेबसाइटवरून फक्त १४,४९९ रुपयात खरेदी करू शकता. या फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज देण्यात आली आहे. मोटोरोला जी४० फ्यूजन स्मार्टफोनमध्ये ६.७८ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. याच्या बॅक पॅनेलवर ट्रिपल कॅमेरा आहे. यात ६४ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा व फ्रंटला सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. यात स्नॅपड्रॅगन ७३२जी प्रोसेसरचा सपोर्ट मिळेल.

POCO M3
POCO M3

POCO M3 हा या लिस्टमधील सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. या फोनला तुम्ही फक्त १०,९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळते. एसडी कार्डच्या मदतीने तुम्ही स्टोरेज वाढवू शकता. फोनच्या बॅक पॅनेलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा सेटअप ६४ मेगापिक्सल आहे. तर फ्रंटला सेल्फी आणि व्हीडिओसाठी ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. पॉवरसाठी फोनमध्ये ६००० एमएएचची दमदार बॅटरी मिळते.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3nLZHeK